प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे.
पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे उदा. आंब्याच्या रासातल्या नूडल्स, आंब्याचे रोल, आंब्याचे गोते, कैरी सॉस, कैरी शेक आदी.
त्याच पद्धतीने सफरचंद, पेरू, संत्री, द्राक्ष, केळी, सीताफळ, पपई अशा फळापासून लारता येतील अशा कृती त्यांनी सांगितल्या आहेत.
फळांप्रमाणेच फळभाज्या, पालेभाज्या, गहू, तांदूळ, ज्वारीसारखी धान्ये आणि गूळ, मध यांपासुन तयार केलेल्या पदार्थांचाही समावेश पुस्तकात केला आहे.
कृती देण्यापूर्वी संबंधीत फळ, भाजी, धान्य यांची माहिती दिली आहे. या पदार्थांच्या निमित्ताने विविध खाद्यसंस्कृतीची आपल्याशी ओळखही होते.
लेखक : विष्णु मनोहर
पाकशास्त्र
राजा प्रकाशन
Pages: 216
Weight: 238 Gm
Paperback
ISBN10: 8174241310
Leave a Reply