खळाळत्या पाण्यात सूर प्रवाही आहे
केशर पहाट वेळी प्राजक्त दरवळून आहे
मिटल्या नयनात स्वप्न अलगद मिटून आहे
सोन सकाळी किरणांचे सडे अंगणी रेघून आहे
मूक ओठांत शब्दांचे चांदणे मधुर आहे
लाजणाऱ्या गालावरी मंद स्मित पसरुन आहे
भिजल्या गात्र देही रोमांच शहारुन आहे
डोक्यावर पदर बाईचा नयनात स्निग्ध भाव आहे
देहाच्या बाहेर मन पिसारा मोहरुन आहे
मी कोण प्रश्न पडता अनामिक चाहूल आहे
विश्वातील अगम्य सारे चराचर तो व्यापून आहे
पाषाणाच्या काळ रेघा नशीब बदलून आहे
मंद उजेड संध्या समयी ज्योत अनामिक आहे
पडतील प्रश्न अंतरी काही उत्तरे हरवून आहे
देहाच्या झिजल्या कुडीत श्वास बंदिस्त आहे
न कळल्या भावनांचा पूर अश्रूंत मिटून आहे
मन ओल हळव्या क्षणी वारा स्तब्ध आहे
पर्णातल्या कळीला घट्ट कवळून मन बेभान वाहून आहे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply