नवीन लेखन...

खंडोबाची थोडी माहिती

” आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी ” ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेउ…

जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने , खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते . येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी , खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते , सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव . ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला .

हे झालं तळी भंडार .

आत्ता खंडोबा विषयी थोडेसे ,

खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला , वीरशैव पंथातील दैवत . कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा . लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणार्या पत्नी ला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.

पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला . तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले , खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो , ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत , पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.

खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी . खंडेराया ला बेल – दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे .
दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे.

खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि “मला तुझा वाहन होऊ दे” आणि मल्लाने विनवणी केली “तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे” त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला , आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो “मल्हारी” ठरला .

खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय . म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे . ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे , ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता . कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर .

खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे . एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत , त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी , पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी .
खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते , त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच “जागरण-गोंधळ ” ह्या लोक-कलेचा उगम झाला . सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे .

लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात,, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते .

मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम “खंड” म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा .

— संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..