खरं तर
नित्य तुझेच स्वप्न पडते.
कारण काहीही असो
आठवांचे मोहोळ उठते
हे असे कां?
याला काहीच उत्तर नसते
पण हे सुंदर सत्य आहे
हे मात्र खरं!
फक्त ही मनातील अव्यक्तता
अंतरात मात्र व्यक्त होत असते
जीवही होतो व्याकुळ
सावरत असतो मी नेहमीच
आता सवय झालीय
माहिती आहे
आठवणी येत रहाणारच
खरं तर तोच एक आनंद
क्षणक्षण जगवीत असतो
हेही भाग्यच म्हणावे!
सारं काही मनासारखं
कधीच होतही नसतं
तरी स्मृतीगंगेच्या प्रवाहात
आपणच डुंबत रहायचं असतं
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०१.
६ – ८ – २०२१.
Leave a Reply