नवीन लेखन...

खरडा आणि ठेचा….

मिरची वंश परंपरेमधले हे उच्चकोटीचे राजश्री पदार्थ…

खरडा आणि ठेचा यांच कुळ जरी एक असल तरी हे दोन्ही भिन्न पदार्थ…त्यात गल्लत बिलकूल होता कामा नये…

खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच…

आजकाल बाजारात पेस्ट सारखा लाल मिरचीचा पदार्थ येतो त्यालाच ठेचा म्हणून खपवल जात पण त्यात काही मजा नाही….

ओबड-धोबड शेंगदाणे, मिरच्या, लसूण, तेल घालून केलेला अस्सल खरडा बनतो तो गावाकडेच…मस्त शेणा-मातीच्या सारवलेल्या अंगणातल्या दगडी पाट्या-वरवंट्यावर, आपल्या आई आज्जीने वाटून-घाटून केलेला खरडा म्हणजे फक्त स्वर्ग….

आपली ही माय माउली त्या दगडी पाट्या-वरवंट्यावर हाताने वाटत तन्मयतेने एकजीव करत तो खरडा खरवडत असताना फक्त तीचा चेहरा पहा…..

आपली सर्व माया, ममता,प्रेमभाव त्या खरड्यात ती अर्पण करत असते…आणि त्याच बरोबर तो खरडा पाट्यावर खरवडताना तो जो काही तिच्या बांगडयांचा नाद होतो ना, तो स्वर-नाद त्या खरड्यात मिसळून त्या खरड्याची रंगत आणि चव आणखीच वाढवत असते…

या पाटा वरवंट्यावरच्या खरड्याची चव आपल्या घरातल्या मिक्सरमधल्या भांड्यातल्या खरड्याला अजिबात येतच नाही…

म्हाळसेने त्यासाठी ख़ास दगडी पाट्याचा मिक्सर विकत आणला पण गावच्या मातीची चव त्या मिक्सरच्या खराड्याला नाहीच…

त्यातल्या त्यात लाल मिरचीचा खरडा हा आता थोड़ा विलूप्त होत असलेला पदार्थ…हा असा दगडी पाट्यावर ओबड-धोबड शेंगदाणे घालून केलेला लाल मिरचीचा खरडा समोर आला की जीव नूसता कासावीस होतो…कपाळावरची नस ताड़ताड़ उडायला लागते..

मस्त गरमागरम भाकरीचा वरचा पदर काढायचा आणि आतल्या मऊ भागावर हा लाल मिरचीचा खरडा छान पेरायचा…त्यावर झकास गरम तेलाची धार मारायची…अहाहा… परमेश्वरा… लिहितानाही तोंडात पाणी पाणी होतय…. नूसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले…

काही शे रुपये मोजून ते पावाच्या तुकड्यावर चिली-प्लेक्स टाकून दिलेला पिझ्झा या अश्या खरडा-भाकरी समोर झक मारतोय…

पूर्वी कुठे गावाला जाताना हमखास हा पदार्थ भाकरी बरोबर बांधून दिलेला असायचा…

एखाद्या शेतावर, विहिरीच्या कडेला, हिरव्यागार झाडाच्या सावलीखाली बसून हे अस भाकरी, लाल मिरचीचा खरडा, सोबत कांदा व दही असेल आणि बाजूला आपली म्हाळसा असेलना तर त्यासारखे स्वर्गीय पंचतारांकीत सुख दूसरे कुठले नाही…

हिरव्या मिरचीचा खरडा तसा सर्रास नेहमी
घरात बनतोच…पोळी बरोबर आणि त्यातल्या त्यात दशमी बरोबर खाण्यात याची खरी मजा….आजकाल प्रवासात शक्यतो हा असतोच….

परदेशात प्रवासाला जाताना अगदी हट्टाने हा हिरव्या मिरचीचा खरडा आणि दहा-बारा दशम्या बांधून घ्याव्यात…..दोन तीन दिवस आरामात कटतात…पैसेही वाचतात…

हिरव्या मिरचीचा हा खरडा बनवावा तर घरच्या लोखंडी तव्यावरच…तो बनवताना उडालेला तिखटाचा धुराळा आणि त्याला मिळालेली ठसक्याची आणि शिंकेची मानवंदना…म्हणजे तळपत्या जिभेला एका पर्वणीचे निमंत्रणच…

म्हाळसाने कधी डब्यातल्या पोळीत बांधून दिलेला हा हिरव्या मिरचीचा खरडा पाहिला की वाटत जणू तिने तिचे चटपटीत हृदयच डब्यात दुड़पून दिलय…

ठेचा मात्र फक्त हिरव्या मिरचीचा…लसणाच्या फोडणीचा तड़का दिलेला ठेचा आणि त्याला किंचित लिंबाची दिलेली चव आणि ताटात वाढून घेतला की त्यावर चमचाभर कच्च्या तेलाची धार…

ते सगळ आपल्या अनामिकेने एकजीव करायच आणि तेच बोट तोंडात घातल आणि त्या ठेच्याचा सणसणीत स्पर्श जिभेला झाला की ब्रह्मानंद टाळी लागलीच म्हणून समजा…मेंदूच्या पार शेवटच्या टोकाला पार हादरून सोडतो….आणि कपाळावरचे धर्मबिंदु आणि डोळ्यातले अश्रु त्या ठेच्याला त्रिवार सलामी ठोकतात…..भल्या भल्यांना उभ्याचा आडवा करणारा हा ठेचा म्हणजे मिरची खानदानची शान..

ठेचा शक्यतो कमी तिखटाच्या मिरचीचा करतात…पण अस्सल खवय्या असेल तर त्याने नंदुरबारच्या किंवा गुंटूरच्या जहाल लवंगी मिरचीचा आग्रह धरावा…हे वाण वेगळच…

खरतर ठेचा काय की खरडा काय या दोघात उजवं कोण आणि डावं कोण हे सांगण जरा कठीणच…

ठेचा आणि खरडा म्हणजे जणू काही माधुरी आणि ऐश्वर्या…

खरड्यात दिसतात माधुरीच्या अदा तर ठेच्यात अवतरते ऐश्वर्याची नजाकत…

खरड्यात जाणवतो माधुरीचा ठसका बाणा तर ठेचा मिरवतो ऐश्वर्यासारखा तोरा…

आणि चुकून हे खरडा आणि ठेचा दोन्ही समोरासमोर आलेच तर लाल शालूतली पारो व हिरव्या पैठणीतली चंद्रमुखी देवा देवा करत आपल्या मागे लागतात….. आपण या लाल-हिरव्या मिरचीचे ‘देवदास’ होतो आणि आपल मन ” डोला रे डोला रे डोला रे डोला…” अस म्हणत आस्वाद घेत झिंगत रहाते…

आताच्या पिढित सांगायच झाल तर हे ठेचा आणि खरडा म्हणजे दिपिका आणि प्रियांका…

एकीला झाकाव दुसरीला काढाव…

यात कोण नखरेल, कोण खानदानी याचा फारसा विचार न करता मस्तानीचा हिरवट नखरा झेलत, लाजून लालेलाल झालेल्या काशीच्या प्रेमात पडत आपण त्यांचा ‘पिंगा पिंगा…’ बघत बाजीरावासारख खरडा-ठेच्यावर ताव मारत रहाव..

केल्यावर आठवण ठेवा एवढेच.

— `मराठी पदार्थ’ या WhastApp ग्रुपवरुन 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..