सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला
खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला …१,
बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते,
मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते…२,
खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,
चुकीचा हा हिशोब, निराशा करी…३,
अंतरातील सुख, नितांत असते
एकाच अनुभवाने, जग विसरविते…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply