अंधार गुडूप झाला
तर घाबरे कशाला
विजेच्या शलाकेला
कशास दिवा उजेडाला
कायम असत्य दावणीला
बांधे कुकर्म जो गाठीला
त्यास असे भीती तमाची
दचके अपुल्याचं सावलीला
प्रतिबिंब पाहता अपुले
जो कचरे स्व नजरेला
नतमस्तक होतानाही
हुरहूर छळे काळजाला
नको नको ते भाव उदास
दाटे कातर समयाला
चोरी आहे मनाची आणिक
भितो तो कुणा चोराला
या दिव्यात उजळून देऊ
अशा अंतरीच्या तमाला
सारे मंगल प्रसन्न ठेऊ
वागणूक आणि वाणीला!!
— वर्षा कदम.
Leave a Reply