वाटत होता शांत मला तो, बघुनी त्याच्या हालचालींना
शिस्तबद्ध ते जीवन असूनी, हास्य उमलते त्याच्या मना….१,
अल्प बोलणें अल्प चालणें, आहार तोहीं अल्पची घेणे
प्रभू नाम ते मुखी असूनी, चिंतन त्याचे सतत करणे….२,
संघर्षाला टाळीत होता, परिस्थितीशी जुळते घेवूनी
वातावरण ते शांत ठेवण्या, प्रयत्न चाले लक्ष देवूनी…३,
अहंकार तो सुप्त असूनी, राग न दाखवी चेहऱ्यावरी
जगण्याचे ते प्रेम बघूनी, मोहाचे वेष्ठन दिसे शरिरी…४,
दाबता साऱ्या षढरिपूंना, बेगडी शांतता बाह्य दिसे
जिंकती त्यांनाच सहजपणे, खरी शांतता चित्तीं वसे…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply