नवीन लेखन...

खायचा नैसर्गिक चुना कसा बनवतात ?

खायचा चुना पाण्यात चुनकळी घालून तयार करतात. चुनकळी म्हणजे कॅल्शियम आँक्साईड – CaO व यात पाणी घातले की कॅल्शियम हायड्राँक्साईड तयार होते. यालाच खायचा चुना म्हणतात. चुनकळी करण्याच्या दोन पद्धती आहेत. शिंपले शंख जाळले कि चुनकळी तयार होते. व त्यात पाणी घातले कि खायचा चुना तयार होतो.

मोठ्या प्रमाणात तयार करताना नैसर्गिक मिळणारी शहाबाद फारशी जाळून चुनकळी तयार करतात व त्यात पाणी घालून खायचा चुना तयार होतो. हे दोन्हीही नैसर्गिक चुन्याचेच प्रकार आहेत.

चुन्याचे उपयोग

चुना हा पानाला लावून  खाण्यासाठी वापरतात. चुन्यामध्ये जास्त पाणी घातले व ते निवळले कि चुना खाली बसतो व पाण्यात त्याचा अंश उतरतो त्या पाण्याला  चुन्याची निवली म्हणतात. हि अल्कलीन आहे. हि पोटात घेतल्याने पोटातील acidity तत्काळ कमी होते असा माझा अनुभव आहे.ज्यांना हाडातील त्रास आहेत कॅल्शिअम कमी आहे गुडघेदुखी आहे अशांनी हि निवली रोज २-२ चमचे सकाळ संध्याकाळ घेतल्यास कॅल्शिअम डेफिशियंसी भरून निघते.

कॅल्शिअमच्या गोळ्या खाण्यापेक्षा या नैसर्गिक चुन्याच्या निवलीचे साइड इफेक्ट नाहीत. हे नैसर्गिक असल्याने शरीरात लवकर शोषले जाते.

या उपचारासाठी पानवाल्याकडे मिळणारी एका चुन्याची पुडीतील चुना बाटलीभर पाण्यात घालावा व हालवून ठेवून द्यावे. काही तासांनी पाणी निवळले की ते स्वच्छ दिसते.  ही चुन्याची निवळी होय. या बाटलीचे झाकण नेहमी बंद ठेवावी.

अरविंद जोशी,  BSc

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

1 Comment on खायचा नैसर्गिक चुना कसा बनवतात ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..