खोदुनी काढे मढे त्याचा
चेहरा निर्विकार
समर्थ बोलती स्पष्ट तेथे
हाच तो अहंकार!!
अर्थ–
दोन मित्रांमधे भांडण झाले, खरेतर पहिल्यांदाच असे घडले पण त्या भांडणामुळे एका मित्राने आजवर घडलेल्या अनेक गोष्टींपैकी त्याला त्रास झालेल्या गोष्टी, राग आलेल्या गोष्टी, न पटलेल्या गोष्टी, घृणास्पद वाटलेल्या गोष्टी बोलून दाखवल्या. दुसऱ्या मित्राला आश्चर्य वाटले की मैत्री मधे या गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या आणि नुसत्या लक्षात नाही तर त्याची बीजे खोल आत रुजली होती. वास्तविक बोलणारा मित्र नेहमी दुसऱयाची टिंगल करायचा, तो कसा मूर्ख, अक्कलशून्य, निकामी आहे हे मस्करीत, पण बोलून दाखवायचा. पण दुसरा मित्र ते अतिशय हलकेपणाने घ्यायचा. पण मस्करी मस्करीत समोरच्याची लायकी कधी काढली गेली हे त्या मित्राला समजले नाही आणि तेच पथ्यावर पडले. मैत्री मधे अंतर आले आणि मग जेव्हा गरज होती तेव्हा मात्र जवळ खरा मित्र नाही आणि त्याचे दुःख झाले पण, वेळ निघून गेली होती.
समर्थ म्हणतात, शतकोन शतके आपल्यावर, आपल्या साम्राज्यावर, आपल्या सामर्थ्यावर माती टाकली गेली तर कालांतराने मन मरायला किती वेळ लागेल याला काही प्रमाण नाही. आणि अहंकारी व्यक्तीला मनावर माती पडायची गरज पडत नाही कारण त्याच्यासाठी बाकी सगळंच मातीमोल असते. समोरच्याची लायकी काढताना आपण आपली किंमत तर करून घेत नाही ना याचा विचार जर केला तर अहंकार हा मिटवला जाऊ शकतो.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply