कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती
गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें
कसा आला नशिबी निराशा मनी येते
अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले
लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले
मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे
नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे
केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब
भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ
खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने
नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने
टिपून ठेवला नंबर त्याचा एका कागदावरी
कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी
निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता
लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता
धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी
कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी
इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे
धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे
सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला
तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला
खरय़ा शिक्क्यासम चालले नशिबही वेगाने
खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply