गाडीवानदादा बैलं तुझी लय भारी, खुळ्ळूक खुळ्ळूक गाडीत , केव्हाच निघते तुझी स्वारी,
सर्जा राजाची जोडी,
भरदार कशी उंचीपुरी,
घुंगूरमाळा डुलवीत डुलवीत दोघांची जोडी चाले न्यारी,
सर्जा राजा वाऱ्यागत पळती,
सुसाट सो सो अगदी धावती,
जसे विमान जाई गगनांतरी,
चाबूक” ना मुळी वापरशी,
कांसरा”” हलके जरा ओढशी
असे करून दिशा दाखविशी,
कसब, ममता केवढी थोरली,–?
गाडीवान दादा झोकात बसशी झुकून पुढे, त्यांना थोपटशी, —
रोज मळ्यात निघे तुमची वारी–!!!
पोरांगत त्यांना वाढवशी,
जिवांपाड जाऊन जपशी,
वैरण पाणी वेळेत देशी,
मुक्या जनावरांचे, प्रेम तुझ्यावरी,-!
दुष्काळ पडता स्वतः उपाशी,
सर्जा राजाची निगराणी खाशी नवल हे की संगे तुझी अस्तुरी,–!!! लेकरांगत कसे वाढवशी,
जवळ घेऊनी कवटाळशी,
होता त्यांना जरा काही,
तुझी मायाममता मोठी,–!!!
सर्जा राजा भाग्यवंत किती,
असे आईबाप त्यांना मिळती, अनोखीच ही हृदयाची नाती, बघितली नाहीत आजमिती,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply