मानवानेही केली वस्ती नदी किनारी,लागला नवीन देशांचा शोध, दर्यावर्दी कोलंबस आणि वास्कोडीगामानां सागर किनारी,मानवी संस्कृती वाढली, बहरली आणि वसली नदीकिनारी !मानवाला प्रथम आढळले बहुमोल “सोने” नदी किनारी,वाहील्या रक्ताच्या नद्या “सोन्या”साठी, रचून प्रेते नदीतीरी,हल्ली किनार्यावरून चालताना बघावे लागते इकडे तिकडे,झालाच आहे घात समुद्र वनस्पतींचा आणि तिवरांच्या झाडांचा, असतात किनारे गलिच्छ, घाणेरडे आणि कुबट वास येणारे,आताशा झालेत प्रदूषित समुद्र, नद्या व तलावांचे किनारे !सोडतात प्रदूषित जल तलाव, नद्या आणि समुद्र किनारी,ओलांडली आहे धोक्याची पातळी समुद्र आणि नद्यांच्या किनार्यांनी, निसर्गाशी नाते न ठेवल्याने समुद्र आणि नद्यांचे झाले आहेत उथळ किनारे ! पावसाळ्यात होते माणसांची भम्मभेरी नदी आणि समुद्र किनारी !आले अतिरेकी समुद्र मार्गे गेटवे किनारी, शोधली नामी संधी अतिरेक्यांनी समुद्र किनारी,
जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply