आज नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम अलेक्झांडर यांचा वाढदिवस किंग्ज डे म्हणून साजरा केला जातो.
डच लोक त्यांच्या राजाचा वाढदिवस साजरा करतात तेव्हा किंग्ज डे असतो. राजा विल्यम अलेक्झांडर यांचा जन्म २७ एप्रिल १९६७ रोजी झाला. विल्यम अलेक्झांडर हे क्वीन बीट्रिक्स आणि प्रीन्स क्लॉस यांचा मोठे चिरंजीव होत. विल्यम अलेक्झांडर हे त्यांच्या तरुण वयात ‘रॉयल नेदरलँड्स नेव्ही’त काम करत होते. पुढे त्यांना लेफ्टनंटची पदवी मिळाली. विल्यम यांना पायलट बनण्याची इच्छा होती. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की ‘मी जर राजा नसतो तर पायलट नक्कीच झालो असतो.’ते २० वर्षांपासून छंद म्हणून के.एल.एम मध्ये पायलट म्हणून काम करत होते. के.एल.एम पूर्वी ते ‘मार्टिन एयर’साठी अतिथी पायलट म्हणून काम करत असत. तेथे विल्यम नेहमी मुख्य पायलटच्या सहाय्यकाची भूमिका बजावत असत. त्यांनी मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनमध्येही काम केले आहे. ऐंशीच्या दशकात, विल्यम अलेक्झांडर यांनी केनियामधील आफ्रिकन मेडिकल रिसर्च एज्युकेशन फाउंडेशनतही काम केले आहे. यानंतर त्यांनी केनिया वाइल्ड लाइफ सर्विस साठी काही दिवस काम केले आहे. विल्यम अलेक्झांडर जल व्यवस्थापन तज्ञ पण आहेत.विल्यम अलेक्झांडर २०१३ मध्ये नेदरलँड्सचे राजे झाले. विल्यम अलेक्झांडर नेदरलँड्सच्या इतिहासातील चौथे राजे आहेत. विल्यम अलेक्झांडर हे १८९० साला नंतर (१२२ वर्षे) नंतर पहिले राजे होत. याच्या आधी बिएट्रिक्स (१९८० ते २०१३), त्यांची आई जूलियाना (१९४८ ते १९८०) आणि आजी विल्हेल्मिना ( १८९० ते १९४८) या नेदरलँडच्या राण्या होत्या.
राजा विलेम-अलेक्झांडर यांनी राणी मॅक्सिमा सोबत २ फेब्रुवारी २००२ मध्ये लग्न केले. त्यांची पत्नी मॅक्सिमा अर्जेटिनामध्ये बँकर होती. विल्यम अलेक्झांडर यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये सपत्नीक भारताला भेट दिली होती.
नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम -अलेक्झांडर हे स्वत: आपल्या कुटुंबा समवेत दर वर्षी नेदरलँड्स मधील एका शहराला भेट देतात. या वर्षी ते आइंडहोवनला भेट देणार आहे.
या दिवसा सोबतच नेदरलँड्स मध्ये दरवर्षी ३० एप्रिलला क्वीन डे म्हणून साजरा केला जातो.
डच भाषेत Fijne Koningsdag! म्हणजेच हॅपी किंग्ज डे (Happy King’s Day!)
Leave a Reply