नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन
तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून…१,
एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई
निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही….२,
पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती
झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती….३,
शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी
आनंदाचे वलय भोवती, समाधान ते त्यास करी….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply