जाहला कहर घोटाळ्यांचा, देखिली, मात्रा अमर्याद भ्रष्टाचाराची ।
स्पर्धा जण जणूं भूवरीं, अब्जावधी रुपये जनांचे, राजरोसपणे हडपण्याची ।
रुपये जनांचे, राजरोसपणे हडपण्याची ।।१।।
त्रस्त झाले अवघेजन, देश पोखरणार्या, भ्रष्टाचारी भस्मासुराने ।
उद्रेक महागाईचा, होरपळीजनां, झाले अवघड, जगणे समाधानाने ।।
झाले अवघड, जगणे समाधानाने ।।२।।
भय नाही येथे कुणा, पदोपदीं लाच घेण्याच्या त्या महाभागांना ।
नुरला वाली कुणी, फोडण्यास वाचा, जनमानसाच्या यातनांना ।।
जनमानसाच्या यातनांना ।।३।।
कुणा न कळे, काय करावे, कसा संपवावा बोकाळलेला भ्रष्टाचार ।
सारथ्या विना, जन सारे, खात होते, दाबून तोंड, अन्यायाचा मार ।।
दाबून तोंड, अन्यायाचा मार ।।४।।
यत्न होते सारे, देश-धुरिणांचे, सत्य अवघे सदैव दडपण्याचे ।
कर्माने त्यांच्याच, जाहले धुरिण, जनक खदखदणार्या असंतोषाचे ।।
जनक खदखदणार्या असंतोषाचे ।।५।।
अपलाप करण्या सत्याचा, जनीं, जे जे करिती, सारा खटाटोप ।
जितुके ठेविती दाबून, उशिरा का होईना, येते उफाळून सत्य अपोआप ।
येते उफाळून सत्य अपोआप ।।६।।
विसरती महाभाग, बैसोनि खुर्चीवरी, आहेत तेथे ते, जनांच्या मर्जीवरी ।
कैफांतअन् नशेत सत्तेच्या गेली मजल त्यांची, जनांना विसरण्यावरी ।।
जनांना पुरते विसरण्यावरी ।।७।।
वानीतुनि तसेच आचरणांतुनि, दाविले अण्णांनी, सामर्थ्य निश्चयाचे ।
वाटले मनोंमनीं धुरिणांस सत्तेच्या, काम नाही हे, असल्या खुळचटाचे ।।
काम नाही हे, असल्या खुळचटाचे ।।८।।
नाही कळला “अण्णा”उन्मच मदांधांना, उचुंग महामेरु तो धैर्याचा ।
हबकली मनें, दोलायमन झाले आसन, आहे, श्रोत तो प्रखर सत्याचा ।।
आहे, श्रोत तो प्रखर सत्याचा ।।९।।
नव्हे ज्ञात, धुरीणींना सत्तेच्या, सामर्थ्य, अलौकिक सत्वशील मनाचे ।
टेकले गुढगे सत्ताधिशांनी, अण्णांस ल ाभतां, सामर्थ्य कोटी कोटी जनांचे ।।
लाभतां, सामर्थ्य कोटी कोटी जनांचे ।।१०।।
राष्ट्र-प्रेमा पोटीं प्रखर, लाविले, अवघेजीवन पणास, देशासाठी ।
ऐकूनि, आर्त शंका या महामानवाची, उतरेल जन, सत्य रक्षिण्यासाठी ।।
उतरेल जन, सत्य रक्षिण्यासाठी ।।११।।
काय सांगावे, सत्तेच्या धुरंधरांना, “ अर्थातुनि आली अंगी धुंदी सत्तेची ।
वाटले तयां, आहेत सम्राट ते, भडकतांच ज्वाला सत्याची, उतरे गुर्मी सत्तेची ।।
भडकतांच ज्वाला सत्याची, उतरे गुर्मी सत्तेची ।।१२।।
काय साधावे, फासवुनिसार्या जनांना, जाहले नाहक, धनी अपशब्दांचे ।
राहूनि साधेपणाने, राखूनि पावित्र्य आचरणाचे, केले सार्थक या जीवनाचे ।।
केले सार्थक या जीवनाचे ।।१३।।
धर्म-गलानितुनिया, अवतरला “किसन”, सत्य शोधिण्या भूचरीं ।
जन सागरास, माय-भूमीच्या, दिली हाक, घेऊनि शिर तळ हातावरी ।।
दिली हाक, घेऊनि शिर तळ हातावरी ।।१४।।
घडविला इतिहास अनोखा, या भूवरीं, प्राणांची लावून बाजी ।
कोटी कोटी प्रणाम अमुचे, होऊनि विनम्र, त्यादिव्यचरणां पाशी ।।
होऊनि विनम्र, त्यादिव्यचरणां पाशी ।।१५।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२८ ऑगसट २०११“राधा-निवास”
मुलुंड (पू), मुंबई ४०००८१
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply