कीटक ते लहान असूनी
रहात होते फळामध्यें
विश्व तयाचे उंबर फळ
जीवन घालवी आनंदे……… १
ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती
उंबराच्या नसे पलिकडे
ज्यासी ते अथांग समजले
बघूनी त्या एका फळाकडे ………..२
माहित नव्हते त्या कीटकाला
झाडावरची अगणित फळे
सृष्टीतील असंख्य झाडे
कशी मग ती त्यास कळे ………….३
आपण देखील रहात असतो
अशाच एका फळावरी
हीच फळे असंख्य असूनी
असंख्य झाडे विश्वावरी ……………४
डॉ. भगवान नागापूरकर
१९२-१००३८४
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply