जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.
तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.
डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.
आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:
१) मंड:
हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.
२) मंथ:
चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.
३) रोटी:
चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.
जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.
तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.
धन्यवाद.
वैद्य स्वाती अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क: ९९६०६९९७०४
चांगले वाटले.मी काही वर्षांपूर्वी पासून तो आहारात आणायचा प्रयत्न करतोय पण त्याला खूप तूस असते.खलबत्त्यात सडून ही जात नाही.पण ते वेगळं करण्याची काहीतरी योग्य पद्धत असावी कारण मी १९७२ च्या दुष्काळात ते एकच दळण गिरणीवर आले होते ते स्वच्छ सातू असल्याचे पाहिले होते.कदाचित गिरणीत ते खूपच बारीक दळण्याने नाहीसे झाले असेल.घरी तसे अवघडच आहे.