गाजर हा कंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा व फारच आवडीचा.गाजर हे लाल व नारंगी अशा दोन प्रकारची असतात उत्तरेकडचे लालाबुंद गाजर उत्तम प्रतिचे असतात.
गाजराचाहलवा,गाजराची,खीर,कोशिंबीर,
लोणचे असे एक ना अनेकरूचकर पदार्थ आपण ह्या गाजरापासून बनवित असतो.तसेच ह्यात मुबलक प्रमाणात जीवन सत्व अ असल्याने हे त्वचा व डोळे ह्यांचे आरोग्य उत्तम राखते.तसेच कर्करोगाच्या रूग्णांना देखील कच्च्या गाजराचा रस प्यायला दिला जातो.
जसे हे स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.गाजराचे रोप हे हातभर उंचीचे होते व गाजर हे जमीनी खाली वाढणारे कंद आहे.
गाजर हे चवीला गोड कडवट असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात व कफ दोष कमी करते पण पित्त मात्र वाढविते.
चला आता गाजराचे उपयोग पाहूयात:
१)इसब,गळवे,फोड ह्यात गाजर थोडे मीठ घालून पाणी न घालता वाफवून घ्यावा व त्याचा पोटीस बांधावा.
२)गाजराचे बी हे मासिक पाळी येण्या करिता ५ दिवस पाण्यात वाटून घ्यावे.
३)वारंवार भरपूर गढूळ लघ्वी होत असल्यास १ कप गाजराचा रस +१/२ चमचा जीरे +१चमचा धणे हे मिश्रण सकाळ संध्याकाळी उपाशी पोटी घ्यावे.
४)मधुमेहामुळे झालेली जखम नसेल व ती चिघळली असेल तर गाजराच्या रसाच्या घड्या
दिवसातून ४ वेळा जखमेवर ठेवाव्या.
५)कच्चे गाजर चावून खाल्ल्यास तोंडास रूची येते,जीभ साफ होते व हिरड्या देखील मजबूत होतात.
गाजर खायचा अतिरेक केल्यास पित्त वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply