आता पुढील गट आहे कंदमुळांचा.ह्या सर्व भाज्या ह्या जमीनी खाली उगवतात.पण आपल्यापैकी सर्वच जण ह्या कंदमुळांचा आहारात हमखास उपयोग करत असतो.त्यामुळे ह्या कंदमुळांच् देखील औषधी गुणधर्म आपण सर्वांनीच जाणून घ्यायलाच हवे.
चला तर मग करायची ना सुरूवात,मग सुरूवात पांढर्या शुभ्र कंदापासूनच करूयात ना,हो अगदी बरोबर ओळखलेत आपण
मुळा
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
जसे स्वयंपाकात मुळा वापरला जातो तसेच ह्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत.मुळा हा जमिनीखाली उगवतो.कोवळा मुळा हा गोड,कडू,तुरट व उष्ण असून कफवातनाशक व पित्तकर असतो तर जुन मुळा हा उष्ण व जड व त्रिदोषकर असतो.
आता ह्याचे घरगुती उपचार पाहूया:
१)अजीर्ण झाले असता मुळ्याचे काप करून त्याला मीठ लावावे व मळून काही वेळ ठेवावे व नंतर त्याचा रस काढुन टाकावा हे काप खावे.
२)मुळव्याध झाली असता मुळा कापून तुपात तळुन साखरे सोबत खावा.
३)चरबीची गाठ शरीरावर झाली असल्यास मुळ्याचा रस त्या गाठींवर चोळावा.
४)लहान मुलांना कृमिंचा त्रास होत असल्यास ४ चमचे मुळ्याचा रस +२ चमचे मध पाजावे व २ तासांनी २ चमचे एरंडेल तेल पाजावे.
५)भुक न लागणे,सर्दी,खोकला ह्यात मुळा व मुग एकत्र उकळून सूप करावे व त्यात मिरी,सैंधव,ओवा व मध घालून प्यावे.
अतिमात्रेत मुळा खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply