नवीन लेखन...

किचन क्लिनिक – मोहरी

Kitchen Clinic - Mohari

आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.

मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.

चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.

१) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.

२) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.

३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.

४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.

५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.

मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

वैद्य स्वाती हे.अणवेकर

आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

1 Comment on किचन क्लिनिक – मोहरी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..