शेंगभाज्या
आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो.
शेवग्याची शेंग
तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात.
ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या शेंगा चवीला तिखट,कडू व उष्ण असतात आणी त्या शरीरातील कफ व वात दोष कमी करतात व पित्त दोष वाढवितात.
जसा ह्यांचा उपयोग रुचकर स्वयंपाक करायला होतो त्यांच प्रमाणे ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.कसा ते पहायचे ना:
१)२ कोवळ्या शेंगा तुकडे करून १/२ लिटर पाण्यात उकळून आटवून १/२ ग्लास शिल्लक ठेवावे त्यात १ चमचा मध व १/४ चमचा सुंठपूड घालावी व हे पाणी सकाळी व संध्याकाळी ४ वाजता प्यावे असे केल्याने सांधेदुखी,ठेच लागून झालेली दुखापत,कंबरदुखी ह्यात आराम मिळतो.
२)अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तींच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची आमटी अथवा भाजी ठेवावी.
३)मासिक पाळी उशीरा येणे,ओटीपोटात दुखणे,स्त्राव कमी होणे अशा तक्रारी असणा-या स्त्रीयांना शेवग्याच्या शेंगांचा सूप त्यात जिरे घालून द्यावा.
४)कृमिंचा त्रास असणा-या व्यक्तिंना शेवग्याच्या जून शेंगा वाफवून रोज सकाळी ती खायला द्यावी व नंतर त्यावर तासाभराने २५मिली एरंडेल तेल प्यायला द्यावे.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Thank you. I like the article.
I like it!