रस्त्याने चालताना अचानक एक पतंगांचे दुकान माझ्या नजरेत आले. बरीच वर्षे झाली की आपण पतंग उडवून !
माझं मनच माझ्याशी बोलू लागलं. जेंव्हा आंम्ही लहान होतो म्ह्णजे दहा-बारा वर्षाचे तेंव्हा आमच्या चाळीच्या शेजारीच एक मोकळी जागा होती. त्या मोकळ्या जागेतूनच आंम्ही पतंग उडवायचो. आता मी जेंव्हा गूल झालेल्या अर्थात तुटलेल्या एका पतंगीला पकडण्यासाठी तिच्या मागे धावणारया दहा – पंदरा लहान मुलांना पाह्तो तेंव्हा मला त्यांच्यावर हसू येत आणि नंतर स्वतःवर ही ह्सू येत कारण एकेकाळी मी ही या मुलांपैकीच एक होतो. मला तर चांगल आठवतय गूल झालेली पतंग पकडण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत आमच्या घरापासून काही मिनिटाच्या अंतरावर असणार्या डोगंराच्या अगदी टोकावरही पोहचलो होतो झाडा झुडपातून रस्ता काढत. त्यानंतर आमची झालेली चम्पी आजही सर्वांना चांगलीच आठविते.
पतंग उडवायची म्ह्णजे फिरकी पकडायला एक माणूस लागतो. आंम्ही त्या कामी आमच्या पेक्षा लहान मुला-मुलींची मदत घ्यायचो. त्यांनाही ते करताना आनंद वाटायचा कदाचित बघून-बघून आपणही पतंग उडवायला शिकू असही त्यांना तेंव्हा वाटत असेल कदाचित. पतंग बदवून झाल्यावर अर्थात उंचच – उंच उडविल्यावर मुक अर्थात स्थिर झाल्यावर आंम्ही त्या पतंगाचा दोर त्या लहान मुलांच्या हातात दयायचो. त्याचा त्या लहान मुलांना खूपच आनंद व्हायचा. त्यावेळी आमच्याकडे पतंग उडविण्यात आणि दुसर्यांच्या पतंगी कापण्यात पटाईत असणार्या लोकांची फौजच होती. त्यामानाने आंम्ही ढ होतो. पतंगीची पैंज लावण्यात सुरूवातीला मला रस नसे पण नंतर नंतर पैंज लावण्याचे, मांज्याला ढील देण्याचे आणि खसटण्याचे तंत्र मी औगत करून घेतले. त्याची परिक्षा म्ह्णून मी आमच्याकडे पतंग कापण्यात सर्वात पटाईत असणारयाच्या पंतगालाच माझा पतंग भिडवला आणि त्याचा पतंग मी कापला त्यानंतर आणखी दोन पतंग मी कापले. हे सार योगा-योगाने झालं होत हे सत्य मला चांगलच माहित होत त्यामुळे त्याची बढाई मारण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. असो !
त्यानंतर वेगवेगळया आकाराच्या आणि प्रकाराच्या पतंगी, कमी अधिक जाडीचे आणि प्रकाराचे मांजे आंम्ही वापरले त्यात बदामी मांज्या माझा खूपच आवडता होता. त्यावेळी लहान-मोठया चार-पाच फिरक्या माझ्याकडे होत्या. इतकेच काय आंम्ही स्वतःच पतंग, मांज्या आणि फिरकी तयार करण्याचेही अयशस्वी प्रयत्न ही बर्याचदा केली होते. त्या काळात दिवसभरात आंम्हाला चार-पाच पतंगी तरी लागायच्या त्यासाठी आईच्या हातापाया पडून पैसे मिळवायचो. आम्ही ज्या जागेतून पतंग उडवायचो त्या जागेपासून हाकेच्या अंतरावर एक मोठ वडाच झाड होत त्या झाडावर दिवसाला आमची एक तरी पतंग आडकायचीच. पतंगीच्या दिवसात त्या वडाची पाने कमी आणि पतंगीच अधिक दिसायच्या त्या वडाला पतंगांचे झाड म्ह्टल तरी ते वावग ठरू नये इतक्या. ज्या दिवशी पतंग उडविताना त्या वडाच्या दिशेने हवा नसेल तेंव्हा आंम्ही देवाचे खास आभार मानायचो. समुद्राच्या किणारी वगैरे जावून पतंग उडविण्याचे भाग्य आंम्हाला कधीच लाभले नाही. आंम्ही ज्या मोकळ्या जागेतून पतंग उडवायचो त्या जागी एक चाळ उभी राहिल्यावरही आमच पतंग उडविणे थांबले नाही त्यानंतर आंम्ही आमच्या आणि शेजारच्यांच्या छतावरून पतंग उडवायला सुरूवात केली. त्यावरून पुढे बरच रामायण – महाभारत घडल हा भाग वेगळा.
त्यावेळी आंम्ही सर्वच मित्र जवळ-पास सारख्याच वयाचे असल्यामूळे नंतर दुसर्याच पतंगांच्या मागे लागलो आणि आमचं पतंग उडविण थांबल ते कायमचच. आता जेंव्हा आंम्ही कोणाला सांगतो की आंम्हालाही पतंग उडविता येते तर ते कोणालाच खरं वाटत नाही आणि ते आमच्या पतंग उडविण्याची परिक्षा घेवू पाहतात. पण खंर सांगायच तर आता पतंग उडविता येईल की नाही याबद्दल आमच्याच मनात शंका असते कारण पतंग उडविणे ही ही एक कलाच आहे आणि कोणत्याही कलेला सरावची जोड ही हवीच असते. तरीही आजही संधी मिळाली तर एखाद्या समुद्र किणारयावरील वाळूत अनवाणी उभ राहून सोबतीला फिरकी पकडायला कोणी खास माणूस असताना अगदी अंधार पडेपर्यत पतंग उडविण्याचे लहानपणी अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण करायला मलाच काय ते स्वप्न पाहिलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल नाही का ?
— निलेश बामणे
Leave a Reply