किती चाले गडबड ही,कोण वरे कोणाला,
वारा वाहे दाही दिशा,
आभाळ पाहे धरणीला,–!!!
झुळुक झुरे वाऱ्यासाठी,
वारा वरतो हवेला,
थंडी तडफडे उन्हाकरता ,
उन मात्र सावलीसाठी,–!!!
रोप तरसते मातीला,
माती जीवनासाठी तरसे ,
जीवन तडफडे ढगांसाठी,
ढग आकर्षित विजेने,–!!!
वीज आभाळा शोधे,
आभाळ डोळे क्षितिजा लावे,
क्षितिज उत्कंठित पहाटेसाठी,
पहाट तळमळे सूर्यामात्रे,–!!!
सूर्य पाहे वाकून वाट,
श्यामल संध्याकाळची,
संध्या तरसे “तमासाठी”,
तम उत्सुक येता रात,–!!!
रात्र तरसे दिवसासाठी,
दिवस म्हणे यामिनीला,
तुझ्या विना जगणे फोल,
केव्हा तू टाकशील कांत,–!!!
यामिनीची ओढ प्रकाशा,
प्रकाश कळवळे उषेसाठी,
उषा आतुर रंगांकरता,
रंग सारे अवकाशा,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply