किती गुरु जीवनात,महत्त्व त्यांचे जाणावे,
सामोरी गुरु कित्येक
त्यांचे मोल ओळखावे,–!!!
आई-बाप श्रेष्ठ गुरु असती,
निसर्ग त्याखालोखाल,
मित्र आणि अनुभव सांगती,
चरित्र आणि वाटचाल,–!!!
कोण कसा आहे कळते,
पाहून संगत त्याची,
मित्रांचे स्थान अढळ,
तेच मानसिकता घडवती,–!!!
आई-बाप जन्मदाते,
सुखदुःखातील मोठे वाटेकरी, नतमस्तकआपण रहावे,
जगताना परोपरी,–!!!
निसर्ग शिकवतो मूकपणे,
ते आपण समजून घ्यावे,
लहान पान सांगते,
असावे कसे जगणे,–!!!
अनुभवाकडून गुरु म्हणुनी,
कित्येक धडेच मिळती,
मौलिक ठरे सरतेशेवटी,
अनुभवाची मोठी शिदोरी,–!!!
अंधारातून प्रकाशाकडे,
फक्त गुरुच ना नेतो,
गुरुविना जीवन सारे,
असा अंधारी चाचपडतो,–!!!
ग्रंथही मोठे गुरु असती,
ज्ञानाचे अपार भांडार,
झुकून सर्वांना नमन ,
क्षणात येता त्यांचा विचार,–!!!
. हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply