किती कोण हा मोठा पंडित झाला
समाजा मधे त्याचाच बोलबाला
ज्ञानरुपी घडा त्याचा हा भरलेला
मी पणा ने तोची वाहून गेला
भ्रमर जाऊनी मध हुंगून गेला
किती घेतला हिशोब कोणी हो केला?
गर्व त्या भ्रमरासी मध प्राशनाचा हो झाला
एके दिवशी तो चिरडूनी मेला
अर्थ-
किती कोण हा मोठा पंडित झाला, समाजा मधे त्याचाच बोलबाला, ज्ञानरुपी घडा त्याचा हा भरलेला, मी पणा ने तोची वाहून गेला
(मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो. आपल्याकडे जे आहे ते वाटावं अगदी सढळ हस्ते वाटावं पण ते देताना जर तुमच्यात मी पणा असेल तर घेणाऱ्याला तुमच्या देण्याचं महत्व उरत नाही.)
भ्रमर जाऊनी मध हुंगून गेला, किती घेतला हिशोब कोणी हो केला?, गर्व त्या भ्रमरासी मध प्राशनाचा हो झाला, एके दिवशी तो चिरडूनी मेला
(जिथे फुकट काही मिळतंय म्हणून सारखे जाऊ नये, आणि जे मिळतंय त्याचा गर्वही करू नये, वाटणारा कारण देणाऱ्यांची वृत्ती जर पलटली तर तुमचं सर्वस्व तो घेतल्या शिवाय रहात नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply