किती राहिले अंतर,आपुल्या मनामनात,
पडला केवढा दुरावा,
दोघांच्याही काळजात, —
कित्येक योजने तू दूर,
हाक तेथून मारतोस,
मुक्या मनातील आर्त,
उगीच का छेडतोस,—!!!
दूर जाता, जवळ अधिक, नियतीचा का असे डांव,
उभा राही पेचप्रसंग,
प्रेमिकांना मात्र घांव,–!!!
उलते सारखी जखम,
बरी,तरीही बंबाळ,
कल्पनांना बसे छेद,
वास्तवाचीच जळजळ, –!!!
गलबले आत जीव,
वाटते तुझीच ओढ,
एकदा तो भूतकाळ,
ढवळून तुही काढ,–!!!
पृथ्वीवर आहोत आपण,
जसे टोकांना दोन ध्रुव,
मधला असह्य होई ताण,
अस्वस्थ करी प्राणधून,–!!!
का स्थान अढळ,
मम हृदयी राखतोस,-?
तुटके भावनांचे आवेग,
मध्येच का डोकावतोस,–?!!
बिंब हाले जसे पाण्यात,
छबी असते अस्थिर,—
नेणीवांना स्पर्शत स्पर्शत ,
राहतोस माझ्या आंत -आंत,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply