नवीन लेखन...

किती संपन्न मराठी भाषा

मराठी किती संपन्न भाषा आहे पहा

एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न :

“दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए”

या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा.

वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे..,

विद्यार्थी-१ (पुणे)
ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली…

विद्यार्थी-२ (नाशिक)
ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी…!

विद्यार्थी ३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस…!

विद्यार्थी-४ (अकोला)
मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली

विद्यार्थी-५ (अमरावती)
कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं !

विद्यार्थी-६ (यवतमाळ)
निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !!

विद्यार्थी-७ (वाशिम)
कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली भैताड़ लेकाची

विद्यार्थी-८ (बुलढाना)
लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..

विद्यार्थी ९ (वर्धा)
बाप्पा !! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत

विद्यार्थी १० (नागपूर)
दिलची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे …

विद्यार्थी ११ (धुळे)
काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड !

विद्यार्थी १२(लातूर) :
आरं बाबो,
अगुदर तर काळजाची पार वाट लावली ! वरनं माज्याकड बगुन दाताड इचकत निगुन गेली, च्या मायला…!

विद्यार्थी १३ (मालवण) :
मेली अवदीसा नायथयली…,
तेचा त्वांडार शिरापडली ती…,
तेच्या आवशिक खाली कोल्यान…,
माझा काळीज नांगरुन.., खिदळत – खिदळत वाटेक लागला ता अक्कर माशी प्वार…!!!

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..