कोडगे लाचारसे
मन विव्हळ हतबल आहे
दिसे सभोवार धूसर अंधुक
जगणे रुष्क कोरडे आहे
मिळो पुन्हा जन्म जिथे
हौसेला मोल आहे
पापण्यांतील मोत्याला
झेले जो हळुवार बोल आहे
बैरागी भैरवी गाते
विराणी कविता वाहे
मुक्त आसवं ढाळत
संध्याकाळ निमाली आहे
साऱ्याला अंत आहे
कष्टांना का मग नाही
रोज नवे दुःख दुखणे
वाट्यास वाढले आहे
दयाघना तुज शरण आले
मन दग्ध अशांत आहे
पेटला वडवानल भडकून
जो जीवा या जाळत आहे!
— वर्षा कदम.
Leave a Reply