


बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी यांनी वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय सुरू केला आहे. लक्ष्मीताईंनी स्वतःसह दोन महिलांच्या सहाय्याने सुरू केलेल्या या व्यवसायाला भरारी घेण्यासाठी भांडवली पंखांची गरज होती. त्यासाठी खऱ्या अर्थाने साथ मिळाली ती कृषी विज्ञान केंद्राची आणि आत्मा या शासकीय संस्थेची.यांच्या सहकार्यामुळे आज लक्ष्मीताईंच्या संतोषी माता महिला गृहउद्योगाने आपला व्यवसाय सातासमुद्रापार म्हणणजे थेट अमेरिकेपर्यंत नेलाय.आजतागायत शेतकरी केवळ माल उत्पादित करीत आला. मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्र फारसं अवगत न केल्यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरतोय. मात्र याला अपवाद ठरतायत लक्ष्मीताई. कारण,एक किलो ज्वारी विकल्यास साधारणपणे १५ १८ रुपये मिळतात. जर त्याच एक किलो ज्वारीवर प्रक्रिया केल्यास त्यातून प्रक्रिया खर्च वगळता जवळपास दीडशे रुपये प्रतिकिलो नफा मिळू शकतो.

Leave a Reply