नवीन लेखन...

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग १

मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत. आम्ही वैद्य मूळचे नागपूरचे. माझे मोठे काका व त्यांचेही काका अशा दोन पिढ्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केल्याने रेल्वेशी त्यांचा घनिष्ट संबंध. पुढे वडिल शिक्षणासाठी मुंबईत आल्याने सतत नागपूर वार्‍या होत. या गाडीचा प्रवास व तिचा मार्ग याबद्दल आमच्यावैद्यांच्या घरातील बऱ्याच मंडळींना खडान्खडा माहित होता.

१९४२ साल. जुलैचा महिना, दुसऱ्या महायुद्धामुळे भारतीय रेल्वे वर जबरदस्त ताण पडलेला होता. नागपुर वरून मुंबईत येण्यासाठी त्याकाळी ही एकमेव गाडी. अर्थातच प्रचंड गर्दी, तिकिटे मिळणे महामुष्कील. अशा सर्व गडबड गोंधळात अडीच महिन्याचा मी सर्प विराम चार वर्षांची माझी बहीण अशा दोघांना बरोबर घेऊन काकांच्या सोबतीने १८ तासाचा नागपूर ते दादर प्रवास तोही तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून आईने कसा केला असेल? त्यात मला जुलाबाचा त्रास. प्रवाशांच्या झुंडीच्या झुंडीडब्यात दर स्टेशनवर शिरत होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता माझे वडील दादर स्टेशनवर आम्हाला उतरवून घेण्यासाठी आले. आम्ही या गाडीने येत आहोत असा निरोपही तारेने वडिलांना मिळालेला होता. स्टेशनवर सर्व प्रवासी उतरले परंतु आमचा पत्ताच नाही हे पाहून ते नाईलाजाने घरी परतले. त्यानंतर तासाभराने आम्ही घोडागाडीने घरी हजर. हे काय गौडबंगाल आहे हे कळेना तेव्हा काकांनी वडिलांना उलगडा केला तर त्याचा खुलासा असा की नेमक्या फक्त त्याच दिवशी नागपूर हुन एक आयोजित दोन मेल गाड्या सोडण्यात आल्या होत्या .ज्यादा निघालेली नागपूर मेल निर्धारित वेळेच्या आधीच पोहोचली जिच्यामध्ये वडील आम्हाला शोधत होते व प्रत्यक्षात नेहमीच्या मेल गाडीने निघालेल्या आम्ही गाडीबरोबर उशिराने पोहोचलो. यादों में गाड्यांच्या आगमनाबद्दल दादर स्टेशनला कोणतीच सूचना मिळाली नव्हती त्यामुळे हा सर्व घोटाळा! परंतु एक गोष्ट मात्र खरी की माझ्या जीवनात नागपूर मेल ही पुढे मी केलेल्या अनेक रेल्वे प्रवाशांची नांदी ठरली.

लहानपणी मुलांना कावळा चिमणीच्या, पंचतंत्रातील गोष्टी सांगतात अगदी त्याप्रमाणे आमच्या घरी माझे वडील , काका, भाऊ आम्हा मुलांना रेल्वे संबंधित गोष्टी अगदी रसाळपणे रंगून सांगत. आमच्या वैद्यांच्या घराण्यातून तो रेल्वे प्रेमाचा वारसा कळत नकळत आमच्यात ही झिरपला. नागपूर कलकत्ता मार्गावरील खडकपूर एक मोठे स्टेशन . जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून या स्टेशनची प्रसिद्धी.माझ्या वडिलांचे काका त्या काळात या स्टेशनवर फार मोठ्या हुद्द्यावर काम करीत होते. खडकपूर गावात मोठी रेल्वे कॉलनी, राहण्यास छान जागा .दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत माझे वडील व त्यांचे मोठे भाऊ दत्तू यांची रवानगी खडक पुरला होत असे. दिवसभर स्टेशनवर येणाऱ्या, जाणाऱ्या गाड्या बघण्यात , स्वल्पविराम सिग्नल यंत्रणा न्याहाळण्यातते दोघे रोजचा वेळ घालवीत. गाडी स्टेशनात शिरत असताना धुराच्या इंजिनाच्या दारातून ड्रायव्हर हाताने खांबाला बांधलेला गोळा सफाईदारपणे उचलत असे . त्याच वेळी त्याच विविक्षित खांबाला इंजिनमधून रिकामा गोळा लावीत असे. त्या गोळ्यामध्ये ड्रायव्हरलापुढील मार्गावर कोठे थांबावे लागेल तसेच वाटत कोठे काम चालू आहे याचा तपशील लिहिलेला कागद मिळत असे. गाडीच्या आगमनाचे वेळी होणारा हा लोखंडी गोळ्याच्या देवाणघेवाणीचाकार्यक्रम वडील व काका दररोज कुतुहलाने पहात असत. माझ्या लहानपणी वडिलांकडून या गोळ्या बद्दलची सविस्तर माहिती अनेकदा कानावर पडत असते त्यामुळे माझ्या मनातही त्या इंजिन मधील लोखंडी गोळ्याने घर केले होते . पुढे ५० वर्षानंतर मला गोव्यातील रेल्वे लाईन वरत्या गोळाफेकीचे दर्शन झाले. कारण त्यावेळी मी स्वतः इंजिन मध्ये बसून प्रवास करीत होतो . योगायोगाने त्या मार्गावर ही गोळाफेकीचे जुनी पद्धत चालू होती.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..