|| हरी ॐ ||
कोंबडा आताश: ऐटबाज
चालतांना दिसत नाही
लाल चुटूक तुरा कसा तो
हलवीत नाही !
दाणे टीपतांनाही मनात भीती असते
अचानक अतिरेकी तर येणार नाही?
कोंबड्याचे आरवणे आता
पूर्वी सारखे राहिले नाही
हल्ली कोंबडे कधीही आरवतात
‘लयी’मध्ये फेरफार करतात
निसर्गाने साथ सोडली
त्यांचीही आता लय बिघडली !
ध्वनिप्रदुशणामुळे कोंबड्यांना झोपायला उशीर होतो
नक्की किती वाजले आहेत
याचा विसर पडतो !
वातावरण आपल्या
वाईट सवयीने बिघडत आहे
पर्यावरण स्वत:चे भान सोडत आहे
त्याचा त्रास कोंबड्यांना होतो
म्हणून कोंबडा हल्ली कधीही आरवतो !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply