कोमेजल्या फुलांचा गंध
वाऱ्यावर उडून गेला बाई
निर्माल्य झाले सुकून त्याचे
कोमेजल्या कळ्या काही
दुःख माणसाचे न दिसते
कधी केव्हा कुठलेच काही
परी दुनिया शिकविते धडे
हजार उपदेश रोज करुनी
विरल्या भावनांचा निचरा
न मोकळा कुठे कधीही
गर्तेत गोल फिरतो वारा
उडून पाचोळा वेदना सारी
मनाच्या कातर वेळा
निःशब्द साथ सुटतील कोडी
आप्त जातील सोडून सारे
थेंब अश्रूंचा दाटून राही हृदयी
नशिबाचे देणे वेगवेगळे
ललाटी सटवी लिहून जाई
नियतीच्या हातात सूत्रे सारी
माणुस पराधीन एकाकी होई
मरणं येणार अंतिम सत्य
परी जगण्याचा मोह राही
मोहजाल ममतेचे सारे
न सुटका यातून काही
दान नशिबाचे पडते तसेच
घडणारे विधिलिखित काही
न सुटला कोण यातून कधी
जन्म मरणं फेरा चाले एकाकी
दुःखाचे डोंगर चढता चढता
भोग येतात आयुष्यात सामोरी
न सुटला यातून कुणीही
पैलतीर पार नौका तरावी
यावे मरणं अचानक हसत
मोह जगण्याचा न रहावा काही
येईल मरणं माझे असेच अवचित
काव्यांत गुंफून राहतील स्वातीचे मोती
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply