वीस जूनला गंगादशहराचा समाप्ती दिवस होता. म्हणून माझी लेक व तिची मैत्रीण दोघी गावाच्या जवळपास असलेल्या एका ठिकाणी रिक्षाने गेल्या होत्या. तिथे एका नदीच्या काठी महादेवाचे रामेश्वर नावाचे मंदिर आहे. पण चिखल झाला होता. रिक्षा जाऊ शकत नव्हती म्हणून पायीच दोन किलोमीटर चालत गेल्या. गंगेचे स्नान. पूजन करून गंगेत आंब्याचे दशहराचे दान केले. आणि कपडे वगैरे बदलून देवदर्शन झाल्यावर तिथेच बसून गंगालहरीचे दहा पाठ केले होते. एक पाठ करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागतात. आणि आता मुख्य सांगायचे आहे ते म्हणजे त्या वेळी तिथे एक कुत्रा आला. त्यांनीही गंगेत स्नान केले. आणि लेकीचे दहा पाठ होई पर्यंत पाण्यात उभे होते. आणि नतंर या परत फिरल्या आणि तोही गेला..
पूर्वीचा जन्म आताचे वागणे याचा काही संबंध असतो की नाही यावर चर्चा नको. पण जेंव्हा कधी असे प्रसंग डोळ्यासमोर घडतात तेंव्हा विचार करणे भाग पडते. मागे एकदा मी एका राममंदिरात एक माकड येऊन असेच कार्यक्रमात बसून राहिले होते असे वाचले व फोटोत पाहिले होते. तर महादेवाच्या मंदिरात नागराज आले होते. याचीही माहिती वाचली होती. पाळलेले प्राणी हे कदाचित पाहून वागत असतील असे समजून घेणे सोपे आहे पण अनोळखी ठिकाणी असे घडते तेंव्हा प्रश्न पडला आहे की कोण असेल तो कुत्रा? खर तर कुत्रा म्हणणे सुद्धा मला बरोबर वाटत नाही. जिथे माणसं हे सगळे करायला नकार देतात तिथे एक मुका प्राणी करतो म्हणून अस वाटत.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply