नवीन लेखन...

कोण बुद्धू कोण शहाणा

सकाळपासून तो मुख्य रस्त्याच्या कडेच्या भुसभुशीत जमिनीमध्ये खड्डे खणण्याच्या उद्योगाला लागला होता. कुदळ मारून मारून आता तो अगदी थकला होता. थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून तो बाजूला बसला. तेव्हाच राज्याचे एक मंत्रीमहोदय तेथून जात होते. रस्त्याच्या कडेचे खड्डे पाहून ते थांबले. त्याला आपल्याजवळ बोलावून ते म्हणाले, “हे काम तू केलंयस का?”

“हो.”
“अगदी बिनडोक आहेस की.”
“सरकार, माझं नाव बिनडोक नाही, बुहू आहे.” “बुहूजी, तुम्ही हे खड्डे का बरं खणून ठेवलंत? त्यात एखादा वाटसरू
पडलाबिडला तर त्याची हाडं मोडून जातील,” मंत्री खोचकपणे म्हणाला. बुद्दू मस्तक नमवून त्याला म्हणाला, “सरकार, हे खड्डे मी रस्त्यात कुठे खणले आहेत? ते तर बाजूला खणले आहेत. जे रस्त्यावरून सरळमार्गाने जातात, ते खड्यात पडण्याचा प्रश्न येतोच कुठे? जे आडमार्गाने, वाट वाकडी करून जातात त्या वाट चुकणाऱ्यांना इशारा देण्यासाठीच मी हे काम केलं आहे.”

हे उत्तर ऐकल्याबरोबर मंत्रीमहोदय एकदम चमकले. त्यांनी बुहूला विचारले,
“कुठे राहतोस तू?”
“आकाशाच्या छपराखाली.
“एकटाच?”
“एकटा कुठे आहे? झाडेपेडं आहेत, पशुपक्षी आहेत. हे सगळे माझे सोबती
आहेत.”

“काय करतोस काय?”
“ईश्वरावर निष्ठा, विश्वास.”
“पोटापाण्याची व्यवस्था कशी करतोस?”
चातुर्यकथा
“ज्याने पोट दिलंय तोच ते भरण्यासाठी अन्न देतो,” बुद्दू म्हणाला. त्याची ईश्वरावरची ही अगाध निष्ठा मंत्र्याच्या हृदयाला स्पर्श करून गेली. त्याने बुद्दूला विचारले, “काही काम दिलं तर करशील?” “पाखराचे पंख छाटून टाकता आहात सरकार?” “नाही, तसं कसलंच मी बंधन घालणार नाही. जर आवडलं नाही तर जेव्हा वाटेल तेव्हा सोडून दे माझं काम ”

बुहूने मंत्र्याला होकार दिला; मंत्री त्याला आपल्या घरी घेऊन गेला. बुहू त्यांच्या गुरांची, बागेची काळजी घेऊ लागला. गाईम्हशींना तो चरायला रानात घेऊन जाई. झाडावर चढून बासरी वाजवत तो त्यांच्यावर लक्ष ठेवीत असे.

असाच एकदा तो बासरी वाजवत होता. बाजूच्या फांदीवर पक्ष्यांची एक जोडी मोठ्या गोड लकेरी घेत होती. एवढ्यात अजून एक पक्षिणी तिथे आली आणि तिने त्या सुरेल गाण्याचा भंग केला. तिने जोडीतल्या मादीला चोची मारून तिथून हटवले. ती जखमी पक्षीण दुसऱ्या फांदीवर बसली. आता जोडीतला नर पक्षी फांदीवरून उडून तिच्याजवळ गेला. त्याबरोबर मादीने त्या जोडीवर पुन्हा हल्ला करण्यासाठी आपले पंख पसरले. बुहूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याला पक्ष्यांची भाषा चांगली येत होती. त्याने दुसऱ्या मादीला या भांडणाचे कारण विचारले.

“या मेलीने माझ्या नराला भुलवले आहे. तिला तर मी मारूनच टाकणार आहे,” मादी म्हणाली. हे ऐकून दुसऱ्या फांदीवरून नर पक्षी मोठ्या तोऱ्यात म्हणाला, “मी पुरुष आहे. मला हव्या त्या मादीला मी माझ्याबरोबर ठेवणार. मी तुला टाकली आहे थोडीच? ही माणसं दोन दोन बायका करीत नाहीत का? तुलाही दुसरीच्या बरोबरीने नांदवीन. तूही राहा तिच्याबरोबर ” पण मादीला हे मुळीच मान्य नव्हते. तिची मान रागाने फुलून गेली. जोरातपंख फडफडवून तिने आपला निषेध व्यक्त केला.

बुहूने त्यांना सल्ला दिला. तो म्हणाला, “हे पाहा; आपले राजेसाहेब मोठे बुद्धिमान आहेत. सर्वांच्या तक्रारी ऐकतात. त्यांचा न्याय अगदी योग्य, अचूक असतो. त्यांच्या दरबारात जाऊन तुम्ही आपले म्हणणे मांडा. तुमचं भांडण मिटवण्याचा उपाय ते सांगतीलच.”

दुसऱ्या दिवशी नर पक्षी आणि दोन्ही पक्षिणी उडून राजाच्या महालात जाऊन पोचले. पण तोपर्यंत राजाच्या दरबाराचे त्या दिवशीचे कामकाज संपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते तिघेही दरबारात जाऊन तिथल्या एका खांबाच्या कडेला जाऊन बसले. राजाची नजर तेथे गेली खरी, पण त्याला वाटले, उडता उडता असेच येऊन विसावले असतील.

दुसरा दिवसही असाच उलटला. तिसऱ्या दिवशीसुद्धा राजाने त्यांच्याकडे
दुर्लक्ष केले, तेव्हा मात्र पक्ष्यांचा धीर सुटला. त्यांची आपसात बेचैनी होऊन
कलकल सुरू झाली. राजाने तिकडे पाहिले, पण तो काहीच बोलला नाही.
चौथ्या दिवशी मात्र पक्षी अगदी अधीर झाले आणि त्यांनी कर्कशपणे कलकलाट
सुरू केला. दरबारच्या कामकाजात त्यांच्या आवाजाने व्यत्यय येऊ लागला.
या पक्ष्यांची नक्कीच काहीतरी समस्या आहे हे राजाच्या लक्षात आले. पण
त्याला काही पक्ष्यांची भाषा येत नव्हती. त्याने दरबारातील साऱ्या मानकऱ्यांना
विचारले. पण त्यांना कोणालाच पक्ष्यांची भाषा समजत नव्हती. शेवटी त्याने या
मंत्र्यालाच आज्ञा केली आणि त्याला फर्मावले की, दुसऱ्या दिवसापर्यंत पक्ष्यांचे
काय गाऱ्हाणे आहे हे जर त्याने शोधून काढले नाही तर तो मंत्री म्हणून कुचकामी
ठरेल.

हा मंत्री तर प्रधान बनण्याची स्वप्ने रंगवीत होता. ही आज्ञा ऐकली आणि तो
अगदी निराश, दुःखी होऊन घरी परतला. त्याला खाण्यापिण्याची शुद्ध राहिली
नाही. तसाच तो अंथरुणावर पडला. आपल्या घरातल्यांशी एक शब्दसुद्धा
बोलला नाही. उद्या दरबारात आपली कशी फट्फजिती होणार आहे या
विचाराने त्याची अगदी झोपच उडाली होती. यापेक्षा आत्महत्या करावी असे
त्याला वाटत होते.

एवढ्यात अचानक त्याला आठवले की, मागे बुहुने सांगितले होते की
पशुपक्षी, झाडेपाने हे त्याचे सोबती आहेत. म्हणजे त्याला पक्ष्यांची भाषा नक्की
समजत असणार. मंत्र्याने बुहूला बोलावून घेतले. दरबारात घडलेला प्रसंग
आणि राजाने दिलेली धमकी याबद्दल त्याने बुहूला सांगितले. हे ऐकून बुहू
हसला आणि तो मंत्र्याला धीर देत म्हणाला, “मालक, तुम्ही चिंता करू नका.
मला त्या पक्ष्यांच्या भांडणाबद्दल सगळी कल्पना आहे. खरं तर त्यांना न्याय
मिळावा म्हणून मीच त्यांना राजाकडे पाठवलंय.”

“तू?”
“हो, मालक!”
“अरे पण, राजाला जर पक्ष्यांची भाषाच येत नाही तर पक्ष्यांची अडचण
त्याला कळणार कशी?”

“मी सांगतो मालक…” असे म्हणून बुहूने पक्ष्यांच्या भांडणाची हकिकत
मंत्र्याला सांगितली आणि तो पुढे म्हणाला, “नर पक्ष्याने दोन्ही माद्यांसह राहावे
असा निर्णय जर राजाला द्यायचा असेल, तर त्याने आपली तीन बोटे त्यांना
दाखवावी. जर दुसऱ्या पक्षिणीबरोबर त्याने राहावे असे ठरवले तर दोन बोटे
आणि पहिल्या मादीबरोबर राहावे असे म्हणायचे असेल तर एक बोट वर करून
दाखवावे. मी या संकेतांचा अर्थ पक्ष्यांना समजावून सांगेन.”

हे ऐकून मंत्री अगदी हरखून गेला. त्याने आपल्या गळ्यातला हार काढून
बुद्दूला बक्षीस दिला. ठरल्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी दरबारात सारे काही घडले.
राजाने एक बोट दाखवून आपला निर्णय दर्शवला. हे पाहून आधी दुसरी मादी
एकटी उडून गेली आणि नंतर नर आणि पहिल्या मादीची जोडी दरबारातून
निघून गेली.

मंत्र्याला या पक्ष्यांची भाषा कशी कळली याचे दरबारातल्या सर्वांनाच खूप
आश्चर्य वाटले. पण मंत्री मात्र तोंड मिटून गप्प राहिला होता. त्याने आपले गुपित
कोणालाच सांगितले नाही. राजाने मंत्र्याची प्रधान म्हणून नेमणूक केली.

आता मंत्र्याला एक नवीन चिंता भेडसावू लागली. ही सारी किमया बुहूची
आहे. आपल्याला पक्ष्यांची भाषा समजत नाही हे आपले बिंग बाहेर फुटले
आणि राजाला समजले तर आपली काही धडगत नाही. आपल्याला या
लबाडीबद्दल कडक शिक्षा मिळेल असे त्याला सारखे वाटू लागले. त्याने ठरवले
की, या चिंतेचे मूळच नष्ट करून टाकावे; म्हणजे घाबरायला नको आणि
काळजीही करायला नको.

त्याने एक पत्र लिहिले आणि बंद करून बुद्दूला दिले; आणि सांगितले की, हे
पत्र त्याने स्वतः नेऊन चांडाळाच्या (चांडाळ – फाशीची शिक्षा झालेल्या
गुन्हेगाराला फाशी देणारा) हातात द्यावे. त्या पत्रात त्याने ‘पत्र आणणाऱ्याचे
डोके त्वरित उडवावे,’ असा आदेश दिला होता.
बुद्दू पत्र घेऊन निघाला. रस्त्यात त्याला मंत्र्याचा मुलगा भेटला. त्याच्या
हातात फुलांची टोपली होती. तो खूप घाईत होता. त्याने बुहूला सांगितले,
“आई पूजेला बसली असणार तेव्हा ही फुले आधी आईला देऊन ये.” त्याचे
बोलणे ऐकून बुद्दू जरा आढेवेढे घेऊ लागला. त्याने मंत्र्याच्या मुलाला सांगितले,
“स्वतः मंत्रीसाहेबांनी हे पत्र तातडीने चांडाळाकडे नेऊन देण्याची आज्ञा केली
आहे.”

मंत्र्याचा मुलगा म्हणाला, “तू फुले तर घेऊन जा आणि ते पत्र दे माझ्याकडे मी एका मित्राच्या घरी निघालो आहे, चांडाळाचं घर मला वाटेतच लागेल. तेव्हा हे पत्र मी पोचतं करीन. बाबा काही म्हणाले तर मी समजावेन त्यांना.”

बुद्दू फुले घेऊन घरी परतला; आणि मंत्र्याचा मुलगा पत्र घेऊन चांडाळाच्या घरी निघाला. पत्र वाचल्याबरोबर चांडाळाने पत्रातल्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले.

मंत्री संध्याकाळी राजवाड्यातून घरी परतल्यावर तिथे बुहूला पाहून त्याला
आश्चर्य वाटले. त्याने रागाने बुहूला विचारले, “काय रे, तू पत्र दिलं नाहीस का
चांडाळाला?”

बुद्दू घाबरून म्हणाला, “मी काय करणार मालक? रस्त्यात मला छोटे मालक
भेटले आणि स्वतः पत्र घेऊन ते चांडाळाकडे गेले. त्यांनीच आईसाहेबांना फुलं
देण्यासाठी मला घरी पाठवून दिलं. आता यात माझा काय दोष आहे?”

हे ऐकल्याबरोबर मंत्री आक्रोश करू लागला, “अरे देवा, असं कसं रे झालं?”
असं म्हणून तो रडू लागला. त्याचा आकांत ऐकून मंत्र्याची पत्नी घाबरीघुबरी
होऊन बाहेर आली. तिला सगळा प्रकार कळल्याबरोबर ती ऊर बडवून घेऊन
रडू लागली. मंत्र्याचा विलाप ऐकून त्याची करणी बुहूच्या लक्षात आली आणि
त्याला समजले की, खड्डा कोणासाठी खणला गेला होता आणि त्यात पडले
कोण! मंत्री जरासा शांत झाल्यावर बुहूने हात जोडून त्याला विनंती केली,
“मालक तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा मला विचारलं होतं की, मी
रस्त्याच्या कडेला खड्डे का खणतो आहे? कोणी त्यात पडले तर काय होईल?
तेव्हा आठवतंय का, मी काय म्हणालो होतो? मालक, मी म्हटलं होतं की, जो
रस्त्यावरून सरळपणे जाईल त्याला बाजूच्या खड्यांची भीती नाही. हे खड्डे
तर वाकड्या वाटेने जाणाऱ्यांसाठी आहेत. तुम्ही बुद्धिमान अन् शहाणे असूनही
आडमार्गाला गेलात, सरळ मार्ग सोडून दिलात आणि खड्ड्यात पडलात. यात
माझी काहीच चूक नाही. आता आपण मला मोकळे करा. मी निघालो आहे.
नमस्कार.”

(गोपालदास : निर्बुद्धीचा राज्यकारभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..