कोण जाणे कसे ठांवे,मन आज भरून आले,
आठवणींच्या आभाळात,
एकेक ढग जमा झाले,–||१||
बघता बघता एकमेकात,
ते कसे खेळू लागले,
हृदयांतरी स्मृतींचे मग,
बिलोरी आरसे हलू लागले,–||२||
स्मरणांच्या हिंदोळ्यावर,
झोके घेत झुलू लागले,
इकडून तिकडे पाय हलवत,
मन सैरावैरा धावू लागले,–||३||
गतकाळाचा जोर घेऊन,
हिंदोळा वारंवार हाले,
वरती जाता क्षणिक सुख,
भासते कधी उगीच खरे,
खाली येता त्याच सुखाचे,
दुःखात रूपांतर का बरे,–||४||
खाली असता ओढ वरची,
पाय मुळीच ना ठरें,
हालचाल अटळ शेवटी,
मनडोही कुणी टाकले खडे,–||५||
या डोहातील प्रतिमा हालती,
गूढ वाटे आकर्षण त्यांचे,
नाती गोती सारी बोलावती,
ऐहिक सुख वाटे’तोकडे,–||६||
संपून गेले ते, रेंगाळे,
चलबिचल होतां आत्म्याची, चढाओढ लागे दोघांमध्ये,
जीत होई फक्त स्मृतींची,-!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply