कोण झोपला उन्हापर्यंत
कोण पूजसी त्यास मनीं
वैराग्य त्यास न म्हणती संत
तोचि ऱ्हासाचा हो धनी
अर्थ–
नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो. पण हे सुद्धा केवळ नैराश्य या स्थितीत होऊ शकते, ज्याने वैराग्य या वाटेवर चालायला सुरवात केली आहे त्याला परत आणणे महाकठीण. पण या व्यक्तींना जर कोणी पूजत असेल, त्यांकना आदर्श ठेऊन आयुष्याचा नकाशा रेखाटत असेल तर मात्र आपण जीवनाच्या ऱ्हासाकडे जात आहोत हे पक्के समजावे.
आपल्याकडे मनुष्याच्या प्रत्येक काळातली मनस्थिती आणि त्याची रूपं, त्यावरचे उपाय, जे चांगल्या स्थितीत ही गरजेचे असतात. हे सगळं संतांनी फार सोप्या शब्दात सांगितले आहे आपल्याला फक्त त्याला follow करायचं असतं पण मार्ग हा योग्य हे दाखवणारा सापडणं कठीण होऊन बसतं कारण आपण उन्हांत सकाळचं पेय पिणाऱ्याच्या मागे लागलेलो असतो.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply