कोण तुझा, कोण माझा,
लवकरच कळेल तुला, मतदार राजा…..
चिखलफेक झाली, आरोप-प्रत्यारोपही झाले,
पाहूया आता, निवडून कोण आले?…..
कोणी म्हणती, “महाराष्ट्र माझा”,
तर कोणी म्हणती, “कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा”
कोणी वाजवतोय आपलाच बॅंडबाजा,
तर कोणी वाट बघतोय निकाल कधी येईल ताजा……
कोणी उत्तर द्यावे, कोणी प्रत्त्युत्तर द्यावे
कोणी आरोप करावे, तर कोणी प्रत्त्यारोप करावे…
विकासाचा प्रश्न बाजूलाच राहिला,
आरोपांच्या गदारोळात म्हणतायत महाराष्ट्र माझा……
वक्ते आले, प्रवक्ते आले,
निवडणुकीच्या धामधुमीत भाषणे देवून गेले,
निकाल लागताच, फिरकणार नाही कोणी,
जो तो लागणार, खोदायला खाणी…..
खाणी खोदता खोदता, पाणी देखील पिणार,
जनतेच्या मात्र तोंडचे पाणीच पळविणार……
आता फक्त राहिले, चार दिवस मधले,
कळेलच लवकर, जनतेने कोणास बरे निवडले?
……………………………..मयुर तोंडवळकर
– श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Leave a Reply