
इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.
प्राणिसंग्रहालय आणि निसगर् उद्यान बऱ्याच शहरांच्या आसपास आहेत. पिंजऱ्यात डांबून ठेवलेले प्राणिसंग्रहालय तर बहुतक ठिकाणी असतच. परंतु मुक्त अभयारण्यात शहराच्या आसपास असण जवळ जवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
पण मुंबई शहरात ती गोष्ट शक्य झाली आहे. जिजामाता उद्यान, राणीची बाग तर कित्येक वर्षांपासून आहे. शहराच्या मध्यवस्तीतील या बागेत हत्ती, उंट, वाघ, सिंह, पक्षी, विषारी साप, पाणघोडे असे सर्वच प्रकारचे हिंस्त्र प्राणी पिंजऱ्यात बंद आहेत. दिवसाला चार ते पाच हजार लोक रोज या बागेत जात असतात. अर्थातच त्यातले निम्म्याच्यावर लोक बाहेरगावचे असतात. पण मुंबई शहरात आल्यावर राणीबाग बघायची हा हट्ट असतोच. कारण इतर राज्यातील पाठयपुस्तकात राणीच्या बागेविषयी धडा असल्यामुळे लहान मुलांमध्ये तिच्याविषयी आकर्षण निर्माण झालेल असत. त्यामुळे मुंबई शहरात आल्यानंतर राणीच्या बागेत जाण्याचा हट्ट धरला जातो.
या बागेकडे इतकं दुर्लक्ष झालेले आहे, की काही विचारता सोय नाही. इथल्या प्राण्यांसाठी आणण्यात येणार मांस-मटण मध्येच गायब होत. प्राणी एकमेकाला जखमी करतात, पण त्यांच्याकडे बघायला प्राण्यांच्या डॉक्टरला वेळ नाही. एक चिंपाझी गजावर डोक आपटून मेला, काळवीट शिंग अडकून तडफडत राहिला. पण त्याची नोंद कुणी केली नाही.
सध्या तर बरेच पिंजरे रिकामे दिसतात किंवा एखाद-दुसरा भांबावून गेलेला प्राणी, पक्षी कोपऱ्यात मान मुरडून बसलेले असतात. स्वच्छतेचा अभाव पिंजऱ्यात असतो. तसेच येणारे-जाणारे जो कागद- कचरा टाकतात, त्यामुळे पिंजऱ्याच्या बाहेरच अस्वच्छता असते. काय ही गचाळ माणस असे पिंजऱ्यातले प्राणी म्हणत असावेत.
त्याच बागेच्या प्रवेश द्वारातच उभे असलेले भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय हे एक अतिशय मौल्यवान पण पूर्णपणे दुर्लक्षिलेल वस्तुसंग्रहालय. अत्यंत छोटेखानी संग्रहालय, मुंबईचा इतिहास आणि वैशिष्टय क्षणार्धात डोळयांपुढे उभी करत. पूर्वी जुन्या मुंबई विषयक छायाचित्रांचे प्रदर्शन इथे होते. आता काही दिसत नाही अशी तक्रार आहे. याच वस्तुसंग्रहालयात आणखी एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळतील विद्यार्थ्यांची आर्ट गॅलरी. अतिशय कमी खर्चात इथे कलादालन उपलब्ध होते आणि येणारी-जाणारी मुल विनासायास या कालादालनाचा आस्वाद घेऊ शकतात.
हे झाल शहरातील प्राणिसंग्रहालयाच. पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक कोटी लोकसंख्येच्या या शहराच्या कुशीत वसल आहे. एका बाजूला सिमेंट काँक्रिटची जंगल वसली आहेत, तर दुसऱ्या बाजूला बोरिवली, ठाणे, मुलुंड यांच्या कक्षा जोडणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. या उद्यानात बिबळे, गवे, रानडुक्कर यासारखे जंगली प्राणी मुक्तपणे विहार करत आहेत. विमानांचा आवाज, शहरातील उजेडांच झोत या सर्वांची त्याना सवय झाली आहे आणि चुकून-माकून ही मंडळी शहरात प्रवेशसुध्दा करती झाली आहेत. राणीच्य बागेपेक्षा थोडी परिस्थिती बरी आहे एवढच म्हणता येईल. कारण इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.
उरल्या सुरल्या जंगलाचा नायनाट करुन तिथे टोलजंग इमारती बांधण्याची स्पर्धा सुरु आहे. शहराचा हा विळखा मृत्यूपाशच म्हटला पाहिजे. केवळ चार वनरक्षक नेमून, त्यांच्या हाती बंदुका देऊन हे राष्ट्रीय उद्यान वाचणार नाही. नागरिकांच प्रेमच ही कोंडी फोडू शकेल.
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक २७ ऑक्टोबर १९९४
Leave a Reply