कोणे एकेकाळी घडले रामायण
काही हजार वर्षे नुसते पारायण
प्रसन्न होत नाही याने नारायण
आचरण महत्वाचे!!
अर्थ–
लहानपणापासून बाळाला त्याच्या घरातले पुराण काळातल्या कथा, रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, जिजाऊ, रामदास स्वामी यांच्या कथा सांगतात. जेणेकरून धर्म आणि कर्म यांचे मर्म त्याच्यात योग्य उतरावे. पण इतिहासातून काय करायचे आणि काय करणे टाळायचे हे मात्र कोणीच सांगत नाही.
मी नेहमी म्हणतो की मंत्र पठण, स्तोत्र पठण नुसते करून काही होत नाही, एकपाठी असणं हे जितकं कौतुकास्पद आहे तितकेच घातक ही आहे कारण, आजकाल चांगले शब्द, चांगले विचार यांच्यापेक्षा शिव्या अन वाईट भाषा ही जास्त प्रमाणित झाली आहे.
एखादं शरीर जमिनीत पुरलं की काही काळाने तेही मातीमोल होतं, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या चुका नुसत्या उगाळत बसण्यापेक्षा काही काळा नंतर त्यांना देखील तिलांजली देणं गरजेचं असतं नाहीतर काही जखमा अशा असतात ज्यांना कितीही मलम लावलं तरी त्या सुकत नाहीत, त्या नेहमी ओल्याच रहातात, आणि त्या जखमा मनावर अन हृदयावर झालेल्या असतात. म्हणून काळानुसार बदलणे, इतिहासजमा झालेल्या गोष्टी शिकून परत इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही ना याची काळजी घेतली की झालं.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply