नवीन लेखन...

कूटकाव्य

आज श्रावण वद्य आमावस्या, पोळा.

(सालाबाद प्रमाणे वर्षातून एकदां या दिवशी) आजच्या दिवसाला समर्पक असं एक कूटकाव्य देत आहे.

एक लावण्यवती तिच्या मैत्रिणीं सोबत पाणवठ्यावर गेली असतांना समोरून एक राजकुमार येतो आणि तिच्यावर मोहित होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी ? तेव्हा राजकुमारी त्याला उत्तर देते …

मेघनादरिपुतात वधि ज्या नराला।।
ते नांव आहे द्वादशात पांचव्याला।।
सरता तयासी दिन अस्तमानी।।
ज्या नर पूजिती तैसा दिसतोसी नयनी।।

(चूक भूल समजून घ्या, जसं मिळालं तसंच देतोय. ‘पाठभेद’ वगैरे असतातच)

त्या सुंदरीने त्याला काय उत्तर दिले पहा.ती सुंदरी असूनही बुद्धिमान असावी –

तूं कसा दिसतोस हे सांगू ? रावणाचा पुत्र मेघनाद, (त्याच्या पित्याचा, म्हणजे त्याचाही) त्याच्या शत्रू राम, ज्याचा पिता दशरथ, त्याने ज्याला मारले, ज्याचं नांव बारांमध्ये पाचवं आहे, म्हणजे बारा महिन्यातला पांचवा महिना ‘श्रावण’, त्या ‘श्रावण’, महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्रावण वद्य आमावस्या, त्या दिवशी ज्याची पूजा केली जाते तो म्हणजे बैल, तसा दिसतोस. म्हणजे ‘तूं शुद्ध बैलोबा दिसतोस’.

(माझा बापड्याचा आपला हा अंदाज हो, कीं -)

ती लावण्यवती असणार, ती त्याला आवडली असणार ती, तोही देखणाच असणार आणि तिलाही तो आवडलाच असणार, (दोघं एकमेकांवर आधीपासूनच ‘मरत’ असणार आणि त्याने ‘डेअरिंग’ करून परंपरेनुसार ‘सुरुवात’ केली असणार (ultimately somebody has to break the ice at a particular point) आणि त्याने पहिली ‘स्टेप’ म्हणून ‘विचारलं’ असेल, आणि तिनेही ‘ऑम्ही नाही ज्जा’ च्या अविर्भावात (तो काळ वेगळा होता) त्याला कृतक्-कोपाने (एकेकाळच्या चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबरीतल्या त्या काळातल्या) नायिकेप्रमाणे, गाल फुगवून, आरक्त होऊन, ओठांचे धनुष्य ताणून वगैरे (पुढचा तपशील ज्याने त्याने आपल्याला स्मरणशक्तीप्रमाणे, कल्पनाशक्तीप्रमाणे आणि वैचारिक आणि शृंगारिक कुवती प्रमाणे, आपापल्या वयानुसार भरावा) ‘तूं शुद्ध बैलोबा दिसतोस’ असं उत्तर दिलं असेल (कदाचित मुरकाही मारला असेल. मुरका म्हणजे काय ते मागच्या पिढीतल्या जुन्या पठडीतल्या स्त्रियांना विचारून घ्या म्हणजे समजेल) आणि तो राजकुमार जे समजायचे ते समजला असेल…. थोडक्यात ती त्याला पटली असेल आणि पुढे ती दोघं प्रदीर्घ काळ ‘सुखाने नांदू लागली’ असतील !

— सुभाष जोशी, ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..