नवीन लेखन...

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – १

१९८४ साली माळेगाव कारखान्यावर सायंकाळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान ऐकायला मी व माझी पत्नी गेलो होतो. माळेगाव तंत्रनिकेतन मध्ये जॉईन होऊन मला ३-४ महिने झाले होते. प्राचार्यांचे भाषण कोण चुकविणार?
बोलण्याच्या ओघात ते म्हणाले – ” शिक्षण शब्दाची फोड मी अशी करतो – शिक + क्षण ! क्षणोक्षणी आपण शिकत असतो, शिकायचे असते.”
प्राध्यापकी करिअरच्या सुरुवातीला हे ऐकून माझी स्वतःची भूमिका अधिक स्वच्छ झाली आणि निवडलेल्या क्षेत्राचा मार्ग अधिक स्पष्ट दिसला.
काही दिवसांपूर्वी ११ सप्टेंबरच्या निमित्ताने डॉ अभय बंग यांचा ” साप्ताहिक साधना ” साठी लिहिलेला विचारपूर्ण लेख दिसला. ( लेखाची लिंक-https://weeklysadhana.in/…/abhay-bang-speech-on…)
थोडा सविस्तर आहे पण आवर्जून वाचायला हवा असा आहे. त्यांत पूज्य विनोबांनी शिक्षणाची केलेली व्याख्या आहे, जी वरील व्याख्येच्या जवळपास जाणारी आहे-
” जीवन हेच शिक्षण ! ” ( Life itself is Education)
शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीच्या उतरत्या/सरत्या टप्प्यावर माझे डोळे नव्याने उघडले. निसर्ग आणि समाज या दोन शिक्षकांच्या मदतीने आयुष्य आपणांस अहोरात्र शिकवत असते.
काल -परवा UPSC चा लागलेला निकाल आपणांस नव्याने विचारप्रवण करण्यास पुरेसा आहे-
अर्ज केलेले उमेदवार: १०,४०,०६०
परीक्षा दिलेले : ४,८२,७७०
उत्तीर्ण: फक्त ७६१ !
कोटा फॅक्टरी IIT बद्दल हेच अंजन आपल्या डोळ्यांमध्ये घालण्यात यशस्वी होते-
फरक असला तर तो इतकाच की सनदी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या परीक्षेपेक्षा IIT साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाची स्वप्ने बघत आपले तारुण्य पणाला लावत असताना याहून अधिक तणावांना कदाचित (खरे तर नक्कीच )सामोरे जात असतील, बाकी आकडेवारी समांतर आहे.
माझ्या लहानपणी, आम्ही फक्त टी म वि च्या परीक्षांसाठी ” शिकवणी ” लावायचो- तीही शाळेतल्या विषय शिक्षकांकडे ! ( हिंदी, इंग्रजी, गणित आणि संस्कृत) तसेच चौथी आणि सातवीच्या आमच्या वर्गशिक्षिकांनीच आमची scholarship ची तयारी करून घेतली होती- शाळेतल्या विद्यार्थ्यांना scholarship मिळावी आणि त्यानिमित्तेन शाळेचे नांव उज्ज्वल व्हावे एवढाच हेतू !
चौथीच्या वेळी भुसावळला scholarship चे केंद्र नसल्याने सहस्रबुद्धे बाई आम्हांला जळगांवला परीक्षेसाठी घेऊन गेल्या होत्या.
मग, ये कहाँ आ गये हम ?
कोटा फॅक्टरी मधील वाक्य आहे – ” IIT में सिर्फ रांचो (थ्री इडियट्समधील आमिरखान) जाते हैं , चतुर (ओमी वैद्य ) नहीं ! “
” फॅक्टरी ” मधील हे जळजळीत सत्य माहित असलेले सारेच कसे मग स्वतःचे “अवशेष ” करून घेण्यासाठी सरसावलेले सध्या दिसतात ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..