साहित्य –
१ कोथिंबीरीची मोठी जुडी
दीड वाटी मैदा
३ चमचे चारोळी
१ चमचा गरम मसाला
१ चमचा साखर
१ लिंबाचा रस
अर्धा चमचा लाल तिखट
हरभऱ्याच्या डाळीचे पीठ
चवीपुरतं मीठ
मोहरी
हिंग
हळद
तेल
कृती –
मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आणि मीठ घालून मैदा भिजवून ठेवावा. कोथिंबीर निवडून, धुऊन, चिरून घ्यावी.
कढईत अर्धा डाव तेल गरमकरून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून दोन वाफा आणाव्या. त्यात लाल तिखट, चारोळी, मीठ, गरम मसाला, डाळीचे पीठ, मीठ घालून भाजीप्रमाणे परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस घालून सारण सारखे करून गार करावे.
मैद्याच्या दोन पुऱ्या लाटून मध्ये तेलाचा हात लावून दोन्ही पुऱ्या एकावर एक ठेवून पोळी लाटावी. ही पोळी तव्यावर दोन्हीकडून हलकी भाजून घ्यावी. पोळीच्या तीन लांबट पट्ट्या कापाव्या. त्या मोकळ्या केल्यावर सहा पट्ट्या होतात. प्रत्येक पट्टीत कोथिंबीरीचे सारण भरून पट्टीला त्रिकोणी खणाप्रमाणे आकार देऊन कडा मैद्याच्या पेस्टने बंद कराव्या.
सर्व पट्ट्या झाल्यावर मध्यम आचेवर समोसे कुरकुरीत तळावे. चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
— निलिमा प्रधान
Leave a Reply