नवीन लेखन...

निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण

निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण यांचा जन्म ७ एप्रिल १९०६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील सागवे- चिंचाडी या गावी झाला.

कृष्णाजी विठ्ठल सोमण हे ‘आधुनिक भास्कराचार्य’ म्हणून ख्यातकीर्त असणारे प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ आणि गणित अभ्यासक म्हणून ओळखले जात. पंचांग सुधारणा, खगोलविज्ञान प्रसार आणि आयुर्वेद संशोधन यामध्ये कृ.वि.सोमण शास्त्रींनी मोठे योगदान दिले होते. ते ‘निर्णयसागर पंचागकर्ते सोमण’ म्हणूनही प्रसिद्ध होते. घरच्या अत्यंत गरिबीमुळे कृ.वि.सोमण यांना वयाच्या पंधराव्या वर्षीच आपले शिक्षण अर्धवट सोडून मुंबईस यावे लागले. मुंबईस आल्यावर त्यांनी ‘निर्णयसागर’ प्रेसमध्ये नोकरीस प्रारंभ केला तेथेच त्यांनी संस्कृतचा आणि अनेक शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास केला व अथक परिश्रम घेतले. त्याच वेळी अच्युतराव कोल्हटकरांशी त्यांचा परिचय झाला. अच्युतराव हे बहुजन समाजाचे पुढारी होते. ते उत्कृष्ट पत्रकार होते. उत्तम वक्ते होते. सोमणशास्त्री अच्युतराव कोत्हटकरांच्या संदेश वृत्तपत्रात काम करू लागले. अच्युतरावामुळे वृत्तपत्र लेखन व वक्तृत्व व यात त्यांना यश मिळवता आले. त्यावळेस सार्वजनिक गणपती उत्सवात मेळे भरत. मेळयांसाठी सोमण शास्त्री पद्यरचना करीत. स्वत: मळयांमध्ये कामही करीत. काही वर्षे सोमण शास्त्रीनी पा. म. भागवतांच्या प्रभात मध्ये काम केले. वैद्य कृष्णशास्त्री नवरे यांनी संशोधन केलेल्या ‘निघंट रत्नाकर’ या वैद्यक शास्त्रावरील ग्रंथा चे संपादन करण्याची संधी सोमणशास्त्रीना पं. वासुदेव लक्ष्मणशास्त्री पणशीकर यांच्याबरोबर मिळाली. सतराशे पृष्ठांचे हे दोन खंड १९३६ साली निर्णयसागरने प्रकाशित केले, त्यावेळी आयुर्वेदाचे अनेक गंध अभ्यासून सोमणशास्रीनी अनेक उपयुक्त टिपा या ग्रंथामध्ये समाविष्ट केल्या. आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांना हा गंथ अतिशय उपयुक्त वाटतो. निघंट रत्नाकर ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सोमणशास्त्रीनी कलली प्रचंड मेहनत पाहून त्यावेळच्या सरकारने वैद्य अप्पाशास्त्री साठे यांच्या सूचनेवरून त्यांचे नाव रजिस्टर्ड मेडिकल प्रँक्टिशनर यादीत समाविष्ट केले. शुद्ध आयुर्वेदाच्या पुरस्कारासाठी जी चळ्वळ झाली त्यात सोमणशास्त्री अग्रभागी होते. ‘निर्णयसागर’ मध्ये असताना सोमणशास्त्रींना खगोलशास्त्र व पंचांगांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ‘सायन- निरयन’ ‘पंचांगातील अयनांश’ या विषयी विद्वानांमध्ये खूप वादविवाद चाले. सोमण शास्त्रींच्या विचारांवर श.बा.दीक्षित आणि पुढे डॉ. केशव लक्ष्मण दफ्तरी यांच्या मतांचा पगडा होता. त्यामुळे प्रत्येक वेळी सोमणशास्त्रीनी दृक्रपत्ययतुल्य पंचांग गणिताचा आग्रह धरला. जुने पंचांग दृकपत्यय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सोलापूरचे पंचांगकर्ते नानाशास्त्री दाते व अकोल्याचे पंचांगकर्ते राजंदेकर यांच्या मदतीने त्या कामात सोमण शास्त्रींना यश मिळाले. सोमणशास्त्री निर्णयसागर, ढवळे व मौज या प्रकाशनाची पंचागे तयार करून देऊ लागले. आज महाराष्ट्रातील पंचागे दृकपत्यय गणिताची आहेत याला सोमणशास्त्री, दातेशास्त्री, राजंदेकरशास्त्री, रुईकर शास्त्री व पालये शास्त्री यांचे श्रम कारणीभूत आहेत. त्यानंतर गुजरातमधील पंचांगेही दृकपत्यय गणिताची झाली. सोमणशास्त्री यांनी अनेक वर्षे जन्मभूमी या गुजराती पंचांगाचेही संपादन केले. १९६६ मध्ये कांची कामकोटीच्या जगद्गुरूंनी भारतातील पंचांगकत्यांची परिषद आंधमधील कालहस्ती येथे बोलावली होती. त्यातही सोमणशास्त्रीनी भाग घेतला होता. १९६८ मध्ये भारत सरकारने भारतातील पंचांगकर्त्यांचा परिसंवाद दिल्ली येथे आयोजित केला होता. त्यामध्ये सोमणशास्त्रींनी एक प्रबंध सादर केला होता. १९५३ मध्ये जागतिक कँलेंडरच्या एकीकरणासाठी युनेस्कोने प्रयत्न केला होता.

१९५३ मध्ये जागतिक कॅलेंडरच्या एकीकरणासाठी युनेरकोने प्रयत्न केला होता. त्यावेळी दैनिक वारगणनेत संपूर्ण वर्षात एक वार गाळण्याचा ठराव मांडला गेला होता. सोमणशास्त्रींनी त्याला कडाडून विरोध केला. भारताचे प्रतिनिधी डॉ. मेघनाद सहा यांच्याकडे आपला विरोध नोंदवला. त्यामुळे तो ठराव बारगळला गेला. सोमणशास्त्रींनी कॅलेंडर रीफॉर्म कमिटीकडे मौल्यवान सूचना पाठविल्या. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला होता. सोमणशास्त्रींचा ओढा खगोलशास्त्राकडे होता. एकदा त्यांनी हैदाबादच्या निझामिया वेधशाळेत आपल्या सहकारी मित्रांबरोबर भेट देऊन तेथील संशोधनाची ओळख करून घेतली. महाराष्ट्रातही अशी वेधशाळा असावी असे त्यांना वाटत होते. १९५० मध्ये सोमणशास्त्रांनी आपल्या सहकारी मित्रांबरोबर ‘ज्योतिविद्या मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या मंडळात येऊन ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घेतले आहे आणि घेत आहेत.

सोमणशास्त्री एक उत्कृष्ट शिक्षक होते. भारतीय विद्यार्थी भवन मध्येही एका संस्थेत ‘सर्वानंदलाघव’ हा ग्रंथ ते शिकवत असत. ‘सुलभ ज्योतिषशास्त्र’ हा त्यांचा ग्रंथ अनेक ज्योतिष शिक्षण संस्थांमधून पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जात असतो . ज्योतिषशास्त्र नव्यानेच शिकणाऱ्यांना हा ग्रंथ उपयुक्त वाटतो. केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. याच ग्रंथामध्ये ज्यो. बळवंत पांडुरंग ढापरे यांनी सोमणशास्त्रींचे जीवनचरित्र लिहिले आहे. त्या मध्ये श्री.ढापरे म्हणत “सोमणशास्त्रींच्या अभ्यासात आक्रमकता विवेचनात परखडपणा आणि स्वभावात नम्रता होती. त्यामुळेच त्यांनी श्रेष्टत्व प्राप्त करून घेतले होते. १९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले.

वेंकटेश बापूजी केतकर, डॉ. केशव लक्ष्मण दफ्तरी, गोविंद सदाशिव आपटे पंडित हरिहर, प्राणशंकर भट्टी, शिवराम गणपत पवार, डॉ.गोरखप्रसाद इत्यादी दृकपत्यय गणित गंथकारांचा गौरव केला. “जसे पंचांगात तसेच आकाशात हवे आणि जसे आकाशात तसेच पंचांगात हवे” या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मताचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. निरयन मानाच्या चैत्रादी मासानी ऋतुकाळ साधत नाही. त्या करिता सायन मानाच्या मासांचा स्वीकार पंचागात व्हावा असे विद्वानांचे म्हणणे आपल्या भाषणात सोमणशास्त्रींनी प्रामुख्याने मांडले होते.

पंचांगात पावसाच्या नक्षत्रांवरून जरी पावसाचे भविष्य दिलेले असले तरी वेधशाळांनी वर्तविलेला पावसाचा अंदाज हा अधिक विश्वसनीय असतो असे सोमणशास्त्री सांगत असत. भारतीय आयुर्वेदाचा त्यांना अभिमान वाटत होता. भारतातील वेधशाळांची संख्या वाढावी असे त्यांना नेहमी वाटत होते. पंचांगातील गणित आणि आकाश यांचा अचूक संबंध हवा असे ते आवर्जुन सांगत. फलज्योतिष हे मनोबळ वाढविण्या साठी आहे असे ते सांगत परंतु त्यांनी कधीही फलज्योतिषाचा व्यवसाय केला नाही. कर्मयोगावरच त्यांचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच त्यांनी जीवनात एवढे कार्य केले. सुलभ ज्योतिषशास्त्र, गणेशपूजा अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

कृष्णाजी विठ्ठल सोमण यांचे ३ जुलै १९७२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..