राऊळी, गाभारी
नयन मी मिटलेले
अंतरंग उजळलेले
भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।।
रूपडे निळेसावळे
कृपासिंधू, कृपाळू
ओढ नित्य अनावर
भान माझे हरपलेले ।।२।।
क्षणक्षण पुण्यपावन
भक्तीत रंगगंधलेला
ध्यानमग्न मीराराधा
कृष्णरूप तेजाळलेले ।।३।।
रूप लडिवाळ लाघवी
अंतरी साक्ष दयाघनाची
निरांजनी दिपवी ज्योत
श्वास सारे सुखावलेले ।।४।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७९
१८ – ६ – २०२१.
Leave a Reply