थांब थांब मोहना, आर्त वेणू वाजवू नकोस
तुझ्याचसाठी वेडी ही , अजून तिला भारू नकोस
थांब जरा मोहना, असा मल्हार छेडू नकोस
होऊन जाईल चिंब धरणी, का उसंतही देऊ नकोस?
थांब जरा मोहना असा तू नाचू नकोस
मनीच्या या झंकारल्या तारा, अजून त्या तोडू नकोस
थांब आता मोहना असा तू बहरू नकोस
भरल्या या तरुवर आता तू झुलू नकोस
थांब थांब बास आता…. पुरे झाले बरसणे
कुडीतले हे प्राण वाहिले तुझ्याचसाठी ओथंबले
— वर्षा कदम.
Leave a Reply