कारूण्यामधूनी उगम पावला आद्य काव्याचा झरा
वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे, मानाचा मुजरा….१,
गमविले नाही व्यर्थ प्राण ते, व्याध बाणा पोटीं
टिळा लावला काव्यश्वरीने, मानाने तुझ्या ललाटी…२,
हृदयस्पर्शी जी घटना घडली, तडफड तव होता
कंठ दाटूनी शब्द उमटले, पद्य रूप घेता….३,
उगम पावता काव्य गंगा ही, वाहू लागली भूलोकी
वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका, अशांचे आली मुखी….४,
काव्य प्रवाह हा सतत वाहे, किती जणांच्या शब्दामधूनी
अंशरूपाने काव्यश्वरी ही, बरसे व्यक्त होवूनी…५.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply