मीच स्वतःला ओळखुन आहे
मी केवळ एक माणूस आहे
भौतिक सुखे सारीच लाभली
आत्मिक! सुखदा सत्य आहे
न आता मनी दुश्वास कुणाचा
आता स्पंदनी या तुप्तता आहे
नेत्री, आठव सारे दवबिंदू परी
अंतरी संवेदनांची जागृती आहे
ना आता सुखदुःखांची गणती
भोगप्रारब्ध, सारे भोगले आहे
हवे कशाला, कुठलेच हेवेदावे
हरिनामी आता मोक्षमुक्ती आहे
जे जगले, ती कृपा भगवंताची
त्याच ऋणात सदैव रहाणे आहे
— वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५.
२५ – १ – २०२२.
Leave a Reply