नवीन लेखन...

कृतज्ञता

हा जीवनातील सर्व सद्गुणातील एक मानसिक स्वास्थ्य देणारा सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे.
प्रत्येकाच्या जीवन प्रवासातील प्रत्येक क्षण हा संस्मरणीय आहे. आणि अशा जीवन प्रवासात जगतांना आपल्याला अगदी कळतय अशा शिशुशैशवास्थे पासून जन्मदात्यांचे , नातेवाइकांचे , गुरुजनांचे , शेजारीपाजाऱ्यांचे , मित्रसहकाऱ्यांचे अनमोल असे योगदान लाभलेले असते. त्यामुळे आपले जीवन अगदी सुखद समृद्ध झालेले असते ही वास्तवता कुणीही नाकारु शकत नाही.
ज्या अज्ञात , अदृश्य , अनामिक शक्तिने आपल्याला जीव सृष्टितील सर्वश्रेष्ठ मानवी जन्म दिला आहे. आपले जीवन सावरले आहे त्याचेही आपण आभारच मानले पाहिजेत हेही तितकेच खरे.!!
आणि या सर्वाप्रती ही आभार व्यक्त करण्याची भावनां म्हणजेच कृतज्ञता ..!!!
आपल्याला सर्वार्थाने मदत करणाऱ्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तिबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजेच Thankful असणे यालाच कॄतज्ञता म्हटले आहे.
To Express Gratitude असेही इंग्लिश मध्ये म्हणतात.
म्हणजेच कृतज्ञतेने आभार व्यक्त करणे.
कधी कधी आपल्यावर झालेल्या उपकारांची आपल्याला सातत्याने आठवण येत असते. त्या उपकारांच ओझं आपल्याला जाणवत असतं. अशा वेळी आपण त्याबद्दल कॄतज्ञता व्यक्त केली , त्याबाबत आपण आभार मानले तर आपल्या मनावरील ताण कमी होतो.
तेंव्हा उपकारांच स्मरण ठेवून नम्रपणे कॄतज्ञता व्यक्त करणं हा सर्व सद्गुणातील सर्वश्रेष्ठ असा सद्गुण आहे.
याबद्दल गुरुवर्य डॉ. न.म. जोशी यांनी एका कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट मी पुढे सांगत आहे.
एकदा ब्रह्मदेवाने स्वर्गामध्ये सर्व सदगुणांची सभा बोलावली होती. साक्षात ब्रह्मदेवाने सभेचे आयोजन केले असल्यामुळे सर्व सद्गुण अगदी आवर्जून सभेला उपस्थित राहिले. सर्व सभागृह पूर्ण भरले होते . तरी देखील ब्रह्मदेव अजुन कुणाची तरी वाट पहात होते. त्या प्रतिक्षेत सभेला उशीर होत होता. बराच उशीर झाल्यामुळे जमलेल्या सर्व सद्गुणांची आपापसात चुळबुळ सुरु झाली , एकमेकांत चर्चा सुरु झाली .
की हे ब्रह्मदेव असे कुणासाठी साठी इतकेवेळ थांबलेत.?
पण इतका वेळ झाल्यामुळे वक्तशीर नावाच्या एका सद्गुणाने सरळ प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनाच प्रश्न विचारला की अहो अजुन किती वेळ वाट पहायची ? सर्वच खुपच वेळ थांबले आहेत. तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले आता फक्त 5 मिनिटे थांबुया आणि आपली सभा सुरु करूयात..
एवढयात पाच मिनिटे होण्याच्या आतच सभागृहाच्या प्रवेशदारातून अगदी लगबगीने एक अगदी शांत , साधीसुधी , कृश , सडपातळ , सावळी अशी व्यक्ती सभागृहात आली देखील. उशीर झाल्यामुळे ती व्यक्ती सभागृहातील अगदी शेवटच्या आसनावर आसनस्थ झाली. हे पहाताच व्यासपीठावरुन साक्षात ब्रह्मदेव पायउतार झाले त्या उशिरा आलेल्या व्यक्तिकडे ( सद्गुणांकड़े ) गेले आणि त्या व्यक्तीला हाताला धरून व्यासपीठाकडे घेवून आले..
सभा संपन्न झाली देखील.
पण उपस्थित सर्व सद्गुणांच्यामध्ये चर्चा सुरु झाली की आपल्या सर्वामध्ये हा इतका मोट्ठा सद्गुण कुठला आहे ? ज्याला खुद्द ब्रह्मदेवांनी हाताने बोटाला धरून स्वागत केले ?
तेंव्हा उपस्थिता मधील उत्सुकता या सद्गुणाने ब्रह्मदेवांना विचारले
की हा सर्वश्रेष्ठ सद्गुण कोण आहे ?…
तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले…. ..
” हा सर्वश्रेष्ठ सद्गुण म्हणजे
कृतज्ञता आहे..!!
ताप्तर्य :
माणसांन सदैव सर्वांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे , आपल्या जीवनात योगदान दिलेल्या सर्वांच्या बद्दल म्हणजे कुणी लहान असो कुणी मोठा असो, कुणी श्रीमंत असो , कुणी गरीब असो केवळ मानवधर्म म्हणून कॄतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
हीच खरी मानसिक मन:शांती आहे..
जीवनाची सात्विक कृतार्थता आहे
इती लेखन सीमा.
वि.ग.सातपुते.
9766544908
दिनांक:- २१ – ४ – २०२२.
पुणे.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..