दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते.
एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती हे लक्षात घेऊन प्रथम साध्या शब्दाने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शक्य असेल तर त्यांना काही भेटवस्तू देऊन सन्मानित करणे ही आणखी चांगली भावना !
ही सकारात्मक अशी उच्च दर्जाची शिकवण भारतीय संस्कृती देते, आपल्या स्वत:च्याच कल्याणासाठी.
अशी सकारात्मकता नेहमीसाठी असली तर तुमचे कोणतेच काम कधी अडत नाही. कारण तुम्ही कृतज्ञ असता ब्रह्मांडाशी ! म्हणजे जो देतो त्याच्याशी !
Leave a Reply